मोठे मंदिर,मोठे व्यवस्थापन,खूप भक्त,ज्याला त्याला भक्तित दंग होताना पहिलाय..हो आज मी एका मंदिरमधे,दगडात एका देवाला कोंबलेल पहिलाय..एक गरीब,बायको आणिमुलंसांगे दर्शनासाठी आलेला.पहाटे चार ला उठून,आनवणी पायाने,आनवणी पोटने,रांगेत उभा राहिलेला.तोंडात भगवंताचे नाव जपत,एक एक पाऊल पुढे टाकत होता.एका हातात लहान मुलाला सांभाळून,त्याला आपली संस्कृती शिकवत होता.मधातच, मीएका श्रीमंताला,पूजा-याला पैसे देऊन,थेट त्या दगडाच्या मुर्तूचे पाया पडताना पहिलाय,हो आज मी एका मंदिरामधे,दगडात एका देवाला कोंबलेल पहिलाय.म्हणे देवाला आमिर,गरीब,सर्वच सारखे असतात.खर असेल कदाचित,पणमंदिरात त्या देवाचे ही मालक ते पुजारी असतात.गरीबाणा दुरुनच हात जोडुनि जावे लागते,पैसा मोजला तर मात्र त्या दगडाच्या मूर्तीला,मग त्याचा माथा लागते।आज माणसालाच, त्या देवाचा,बाजार मांडताना मी पहिलाय.हो आज मी एका मंदिरामधे,दगडात एका देवाला कोंबलेल पहिलाय.इथे प्रत्येकाच्या घरी साक्षात देव आहे,मी त्याना आई-वडील म्हणतो.आता कदाचित mom आणि dad हे नाव असतील.देव ही ज्या आई समोर नमतात,त्या आईलाच तीळ तीळ मारुन,मी लोकणा मंदिरात माथा टेकताना पहिलाय.हो आज मी एका मंदिरामधे,दगडात एका देवाला कोंबलेल पहिलाय.
No comments:
Post a Comment