Wednesday, August 13, 2008

बरं झालं, त्याचं लक्ष नव्हतं....!

परवा मला तो दिसला, त्याच्या बुरखेवाल्या बायकोबरोबर,बोकड दाढी, डोक्यावर जाळीची पांढरी गोल टोपी,किती वेगळा दिसत होता, पण मी ओळखलं।माझ्या भावाचा पर्यायाने माझा मित्र अन्वर होता।अत्यंत हुशार, नम्र,मितभाषी अन्वर।इंजिनिअरींगला विद्यापीठात पहिला आलेला,माझ्या आईबरोबर एकदा बसने प्रवास करत होते,त्याने पाहिलं. भर बसमध्ये आईला वाकून नमस्कार केला।आईला केवढं कौतुक वाटलं होतं त्याचं॥!बरं झालं आता त्याचं लक्ष नाहीयं॥माझ्या सासुबाईंना करेल का तो तसाच वाकून नमस्कार?पण हल्ली त्यांची मुलं शाळेत वंदे मातरमही म्हणत नाहीत म्हणे!आणि समजा नमस्कार केला असता, तरी सासूबाईंना रुचलं असतं?आधीच त्यांच कडक सोवळं ओवळं,सुनेचा मित्र ही कल्पना धक्कादायक॥आणि त्यात असला? मग तर..तो बदललेला दिसतोयं! माझंही तसंच आहे ना!बेकायदा बांधली गेलेली मशिद, रस्ता अडवून होणारा नमाज॥!आमचा विरोध....!तो येत असेल तिथे नमाज पढायला?कसा असेल तो आता?पण बरचं झालं,त्याचं लक्ष नव्हतं,अज्ञानात सुख असतं ना?(कवयित्री शैलजा)

No comments: