Wednesday, September 22, 2010

आता पुन्हा असतो काही दिवस अबोला .....!!!!

आता पुन्हा असतो काही दिवस अबोला .....!!!!


तिला वाटतं दरवेळी मीच चुकतो

कारण बोलताना कदाचित मीच तिला hurt करून जातो

एवढ्याश्या नाकावर येतो केवढाला राग

नि तिचा चेहरा पडतो !

आणि माझ्या मनात मोठ्ठा ढग गडगडतो !!

पुढचं काय ठरलेलेच असतं

चार दिवस अबोला, नंतर आपणच जाऊन गोड बोला!!!

चूक तिची असो व माझी sorry मात्र मीच म्हणायचं !!!!

मग तीन पण जरा हसत हसत असं नै तसं, तसं नै असं

असं सांगायचं .

मग मी पण 'असं असं' करायचं

मैत्रीत कधीतरी आसवं आणि नंतर हसं असं चालायचंच !!





चुकून कधीतरी चुकीचे शब्द बाहेर पडतात.

मनं दुखावतात.

आणि टचकन डोळ्यात पाणी येतं.

पापण्या पाणावतात.

त्या रात्री दोन्हीकडच्या उषा भिजतात.

उर उसासतात.

घड्याळातले काटे सरकता सरकत नसतात.

वहीची पानं पलटता पलटत नसतात.

पिंपळाची सुकलेली पानं मात्र ,अजूनही

आठवणी ताज्या ठेवून वहीत तशीच बंदिस्त असतात !!



त्या काळ्या शांततेत डोक्यात मात्र घुमत असतात

असंख्य विचारांचे आवाज.

जगजीत सिंगच्या गजल आणि आर .डी .ची sad songs

ऐकत रात्र कशीतरी सारून जाते.



दुसऱ्या दिवशी मीच तिच्याकडं बघतो.

मी मत्र तिच्यासाठी एक अनोळखी असतो.

तिचे निःशब्द ओठ आणि शांत डोळे बरंच

काही सांगून जातात !



आता पुन्हा असतो काही दिवस अबोला .....!!!!

No comments: