Friday, September 17, 2010

" जगायचे होते रे ... खूप जगायचे होते

डोळ्यांत साऱ्यांच्या दिसे आता घृणा


ओठांत आपला शब्द ना उरला

चूक नाही यात काहीच त्यांची

दैवान घातला कसा नशिबावर घाला "



" जगायचे होते रे ... खूप जगायचे होते

बरच काही अजून करायचे होते

माझ्यासाठी नव्हे फक्त तिच्याचसाठी

थोडे अजून मरण लांबवायचे होते "



" पण तिलाच आताशा नकोसा झालोय

चेहरा तिचा मला सार ... सांगतोय

इतरांना उगीच कशास सांगू नाती

तिच्यातच सारा परकेपणा दिसतोय "



कितीतरी वेळ मग तो शांतच होता

काहीतरी करायच ... मनात पक्क करत होता

फोनवर दुसरीकडे मीही तसाच

काय वाढलय पुढे काही अंदाज नव्हता



" नकोसा झालोय रे ... आता "

पुन्हा त्याचा श्वास कोंडला

" एक काम करशील माझ ? "

जणू काही निर्वाणीच बोलला



" संपवावे वाटते हे असहाय जीवन

आण कुठून तरी एकच प्याला

रिचवू देत नरडीत क्षणात

पुढे प्रवास हा महाग झाला "



मी नाही म्हणालो तेव्हा त्याने

एक दीर्घ उसासा सोडला

" तूही परकाच ... " म्हणत अचानक

फोन त्याने ठेवला



मी घाईत निघता घराकडे त्याच्या

फोन माझा पुन्हा वाजला

बेवारस प्रेताजवळील मोबाईल मध्ये

पोलिसांना माझा " Recent Call " दिसला

No comments: