Friday, September 17, 2010

सध्याच हसतं - खेळत वातावरण सोडून

सध्याच हसतं - खेळत वातावरण सोडून


पूर्वीसारखाच एकटाच शांतपणे रस्त्याने चाललो होतो....

चालताना अचानक रस्त्याच्या कडेवरच्या दुकानावरील पाटीकडे लक्ष गेल,

त्यावर '' तिच '' नाव झगमगत होत......!!

डोळे भरून तिच नाव पाहिलं.....वाचल.....पुन्हा पुन्हा ते वाचल.......

हेच नाव हातावर कितीतरी वेळा लिहल होत अन खोडल होत.....

किती गोड वाटत होत ते....!

क्षणभर आताच्या '' रिकाम्या '' हाताकडे पाहिलं.....

अन त्या क्षणभरातच............

तिच माझ्या आयुष्यातून तडकाफडकी निघून जाण आठवलं....

' माझा जास्त विचार करू नको ' हे तिच मन तेव्हा होत बोललं.....

पुन्हा त्या दुकानाच्या पाटीकडे नजर टाकायची हिम्मत झालीच नाही..........



रात्री जेवण झाल्यावर नेहमीप्रमाणे

तार्यांबरोबर आकडेमोडीचा खेळ खेळत बसलो....

तारे मोजता - मोजता शुक्राच्या चांदणी जवळ आलो....

'' शुक्राची चांदणी............. ''

ती चांदणी सुद्धा फिक्की पडेल अस तिच सौन्दर्य होत...!

या चांदणीमूळच तिच्यावर कितीतरी कविता केल्या होत्या......

क्षणभर नजर उगीचच शून्यात गेली...

अन त्या क्षणभरातच.............

तिच माझ्या आयुष्यातून अचानक निघून जाण आठवलं...

' मला विसर ' हे तिचे शेवटचे शब्द अजूनही मनात घर करून आहेत

पुन्हा त्या शुक्राच्या चांदणीकडे पाहण्याची हिंमत झालीच नाही....



नेहमीचाच फावला वेळ...........

समोर डेस्क वर कोरा कागद अन शाईच पेन..

यांनी तर दिल होत मला कवितेच देण...

या कोर्या कागदावर शाईच्या पेनन तिच कितीतरी सौंदर्य उतरवल होत....

कितीतरी आठवणी जाग्या झाल्या होत्या..

क्षणभर नजर त्या ' कोर्या ' कागदाकडे गेली...

अन त्या क्षणभरातच..........

तिच डोळ्यासमोरून निघून जाण तरळल..

डोळ्यातून नकळतपणे निघालेले दोन थेंब त्या कोर्या कागदावर ओघळले...

आता तो कोरा कागद अन ते शाईच पेन पुन्हा हातात घ्यायची हिंमत झालीच नाही...

No comments: