Friday, June 25, 2010

§§ मी आणि माझं मन..... §§

बंदिस्त झालय हे मन आजकाल,

जगण्याचा विचारच करत नाही

लाख प्रयत़्न केला याला समजावन्याचा,

पण तिला विसरायला, तयारच होत नाही



मी म्हणालो या मनाला,

काळ हाच या जखमेवरचं औषध आहे

मन उत्तरतं……

या काळाच्या प्रत्येक क्षणामध्ये,

फ़क्त आणि फ़क्त तिचिच तर आठवण आहे.



मग मीही म्हणतो रागाने त्याला,

विसरून जा जे झालं, तो एक भूतकाळ होता,

सर्वस्व विसरुन प्रेम केलस म्हणून काय झालं,

तो प्रवास तर इथपर्यंतच होता….



यावर मात्र हसतं “ते” मनं आणि सांगतं………

अरे प्रेमाला काळात बांधून विसरून जाणं कसं शक़्य आहे?

या काळातच तर माझं जगणं होतं…

हा प्रवास तु सुरू केलास म्हणून काय झालं,

याचा शेवट करणं तुझ्या-माझ्या हातातं नसतं…



असंच मी रोज या मनाशी भांडत बसतो,

समजुतीचे चार शब्द ऎकवत राहतो,

तिला तर मीच हरवून बसलोय,

पण या मनाबरोबर भांडून का होईना,

मीही तिच्याच आठवणीत जगत असतो……



तिच्याच आठवणीत जगत असतो…………

No comments: