Thursday, March 4, 2010

बापाचं प्रेम

बापाचं प्रेम
आई बद्दल सगळेच बोलत राहतात
पण बापाबद्दल कोणी बोलत नाही
जणू त्या बापाला सगळेच गृहीत धरतात
त्याची जाणीव हि कोणाला होत नाही

आईचं प्रेम चांदण्या प्रमाणं असतं
आयुष्याच्या नभाला मोहक बनवतं
बापाचं प्रेम त्या ढगा प्रमाणं असतं
रणरणत्या उन्हात नकळत सावली देतं

मुलीच्या लग्नात आई रडत असते
बाप रडत नाही म्हणून तो कठोर नसतो
त्याला हि तो क्षण वेदना देतो
पण त्याचं ते प्रेम अबोल असतं
आतल्या आतंच तो सोसत असतो
भावना न व्यक्त करणं जणू त्याचं कर्तव्यच असतं

बापाचं प्रेम मेणबत्त्या प्रमाणे असतं
दुसर्याला प्रकाश देतं पण स्वतः मात्र जळत असतं
त्याच्या त्या प्रकाशात सगळेच न्हाहून जातात
पण त्याच्या अस्तित्वाबद्दल कोणीच बोलत नाही
आईच्या प्रेमाला कसलीच तोड नाही
पण बापाची जाणीव कोणालाच का होत नाही ??

No comments: