Friday, February 5, 2010

शहाण्या माणसांनी कधीच नाही प्रेमात पडावं

प्रेम तर खूप केले  तिच्यावर, बहुतेक कोणी   केले  असावं

पण  ती  मात्र   'वेडा आहे तो'  बोलत  सारख  हसत राहावं

मला  तर करमेच  ना  ! वाटत  होते  सारखे  तिला  पाहावं

बाकीच  सगळे  विसरून तिची  आठवण  काढत  कोणत्यातरी  कोपरयात  बसावं

सगळे  होते  सोबत  माझ्या  तरी  वाटत  होते कोणी सोबत  नसावं

एवढा   आंधळा   झालो होतो   मी  डोळे  उघडे  होते  तरी  काही  नाही  दिसावं

मनात  वाटले  एकदा  आपल्या  मनातले  तिच्यासमोर  बोलून  तरी  बघावं

पण  नसेल  तिचे  प्रेम  आपल्यावर, नेमके  त्याच  वेळी  आठवावं

तिला  सारख  पाहण्यासाठी  नेहमी  तिच्या  मागे  जात  जावं

ती  चालत  असली  आपल्यासमोर  तर  आपल्याला  जायचं  कुठे  हेच  विसरावं

एकदा  काय  माहित  कसे  काय? पण  तिनेच  येवून  माझ्याची  बोलावं

बोलायचं  कसले  तिचा  सर्व  राग  माझ्यासमोर  काढावं

माझ्या  मागे  कधीच  लागू  नकोस, असे  धमकून  जावं

विचार  केला  हि  नाही  तर  नाही  चला  दुसरीला  पटवावं  

पण  कसले  काय ? सगळ्या  पोरींमध्ये  हिचेच  चित्र  दिसावं

बोललो  सोडून  द्यावं  सगळे  जीवनात  तरी  लक्ष  घालावं

बहुतेक  प्रेमात  सगळ्याचं  असच  होत  असावं

जे  आपले  असेल  ते  आपल्यालाच  परत  भेटावं

प्रेमात  जो  पडला  त्याने  संपूर्ण  आयुष्य  कशाला  रडत  घालवावं?

येईल  दिवस  एकदा  तिनेच  आपल्यासमोर  येवून  रडावं

प्रेम  वाईट   नसले  तरी  सगळ्यांनी  तिथे  कशाला  जावं?

आयुष्यात  भरपूर  काही  आहे  करण्यासारखं  तेथे  लक्ष  द्यावं

खरे  प्रयत्न  करून   आपण  सुद्धा  प्रसिद्ध  वाहावं

कशाला  पाहिजे  प्रेयसी ?? त्यापेक्षा  आपल्यावरच  खूप  प्रेम  करावं

जीवनात  न  रडता  नेहमी  हसावं  आणि  हसवत  राहावं
   

 :) :) :) ;) ;) ;)

No comments: