Saturday, December 5, 2009

एक कळी……

अशाच एका सकाळी




सहज भेटली एक कळी…….

कळी खूप नाजूक होती…….

तरी फुलावे वाटे तिला सर्वांसाठी…….

कधी वारा तिज त्रास देई…….

लटपटे शरीर पण तशीच उभी राही…….

पाऊस खुपच कधी वेगाने बरसू पाही…….

अस्तित्व टिकवायची धडपड सारे जग पाही…….

तशीच फुलू पाही ती जोमाने…….

जरी झाला व्याकुळ ह्या उंन्हाने…….

देव नेहमीच तिची परीक्षा घेई…….

का असे ?तिने कधी प्रश्न केला नाही…….

नेहमीच ती आघात सोसू पाही…….

तरी खोटे हास्य नेहमी ओठतून वाही…….

प्रवास ना माहीत तिज तिच्या आयुष्याचा…….

तरी एक संघर्ष सगळी नाती टिकवण्याचा…….

सुकली जरी ती,तरी नवा जन्म घेईल…….

असंख्य वादळे पुन्हा झेलेल…….

अस्तित्व स्वताचे टिकवून ठेवेल……

एक दिवस तीचाच येईल…….

No comments: