Tuesday, October 6, 2009

शोध



जीवनाच्या वाटा तुडवल्या मी हिंडत
कधी थकून चालत, तर कधी धावत-पळत
नेहमीच ते पवित्र सत्य शोधत
जे पैसे दिले तरी नाही सापडत
समजायचं म्हटलं तरी नाही कळत
मरुनही नाही जे मिळत
आपल्याला जिवंत ठेवतं तिष्ठत
जे एका काळ्या गुहेत असतं रडत
दर क्षणी होणाऱ्या दु:खाने कण्हत
बाहेर यायचा नाकाम प्रयत्न करत
जे आत्याचार केला तरी नाही मरत
वायु नाही मिळला तरी श्वास नाही सोडत
असतं ते कसंबसं जिवंत धडपडत
एका घुसमटलेल्या पाखरासारखं तडफडत
त्याच्या जुन्या यशाला स्मरत
त्याच्या अस्थित्त्वाचा दोर घट्ट धरत
स्वतंत्र इच्छा उराशी बाळगत
एका आशेची अतूरतेने वाट बघत
जेव्हा कळालं मला, माझा विश्वास होता तुटत
ते दडलेलं होतं तुझ्यात....फक्त तुझ्यात

No comments: