Wednesday, June 3, 2009

तुझ्यात मी पाहिल

आसे कसे प्रिया तू वेड्या सारखे प्रश्न करते ?
काय पाहिले तुम्ही माझ्यात आसे कसे म्हणते ?
गोंधळलोना या प्रश्नानी खरच काहीच नाही सुचले
काय सांगावे ,काय समजवावे ,बोलनेच खुटले
कसे समजवीनार स्वप्नच पड़न ,काळजाच धडधडन
नाही मला नाही हे जमणार हे आसे बोलन
लहान मूल कसे निरागस आसते
भल बुर त्याला काहीच कळत नसत
आश्याच लहान मुलाचा आवखळपना
तुझ्यात मी पाहिलाय
बरसनारा पावूस जसा सरे सरे भिजवुन टाकतो
तन मन सारे क्षणात सुख्वुन टाकतो
त्या धारांचा आवेग तुज्यात मी कितीदा अनुभवलाय
वरु न जरी शांत आसला तरी आतून सागर बैचैन आसतो
सागराचा तो शांतपना कित्येकदा तुझ्यात दिसलाय
सारे काही बरोबर घेवून वारा नुसताच वाहत आसतो
सुगंध दुर्गन्ध सारे काही तो बरोबर नेत आसतो
त्या वार्याचा आवखळपना कित्येकदा तुज्यात जाणवला आहे
कधी कधी मी वेड्या सारखा विचार करतो
प्रत्येक जागी , प्रत्येक गोष्टीत सहभागी तुला धरतो
माझ्यासारखा वेडेपना नेहमी तुझ्यात मी पहिला आहे
शब्दाना आर्थ आसतोच तरी सर्व त्यात नाही व्यक्त करता येत
न व्यक्त करता येणारे सारे मी तुझ्याकडून मी मिळविले आहे
हृदयतील आणु रेनूत तुला मी पाहिले आहे
कारण हृदयाच्या प्रत्येक कोपरयात
फक्त तुला आणि तुलाच मी पाहिले आहे

No comments: