Wednesday, June 3, 2009

ती म्हणजे,

ती म्हणजे,
अगदीच निरागस
नेहमीच हसणारी,
दु:खात सुद्धा
सुख शोधणारी...

मैत्रीण असावी अशी
निरागस आणि प्रेमळ,
बोलणे तिचे
रोखठोक आणि सरळ...

दु:ख पचवण्याची क्षमता
मात्र तिची अफाट होती,
म्हणुनच की काय सर्वांना वाटे
दु:खाची झालर तिजवर कधीच नव्हती...

तिला समजण्यात इतरांसारखाच
मी ही तसा कमीच पडलो,
तिला काय हवे ! काय नको !
यासाठी अनेकदा धडपडलो...

तिला त्रास होइल अशा
सर्व व्यक्ति अन् गोष्टींना
मी सहजतेने टाळले,
न बोलण्याचे दिले वचन
मनापासून पाळले...

यापूर्वी कधी
मी रागावलो नाही,
ती म्हणायची,
तुझं असलं वागण
मला काही पटत नाही...

आता काळजीच्या हेतूने
अधूनमधून रागावतो,
तिचे आपले उगाच म्हणणे
की, अविश्वास दाखवतो...

दिवसागणिक दिवस जाता
आठवणींचे क्षणही सारेच सरले,
सोबत असावी कुणाची म्हणुनी
तिलादेखील घेवुनी गेले...

दूर वर गेली तरी
तिची काळजी वाटतेच हो...!
न मिळालेले सुख तिला
भावी आयुष्यात मिळत राहो...

आता तरी मनाला थोडे
हलके हलके वाटते,
प्रत्यक्ष्यात नाही पण
स्वप्नात मात्र ती भेटते...

विचारते मला,
कसा आहेस ? काय करतोय ?
मी म्हणतो,
काही विशेष नाही ग..!
चेह-यावर तुझ्या आनंद बघतोय...

ती म्हणजे
अगदीच निरागस
नेहमीच हसणारी,
दु:खात सुद्धा
सुख शोधणारी...

No comments: