Saturday, November 1, 2008

"वेडीच आहेस "

तुला कसं गं काहीच कळत नाही ....येथे जाळणारे बरेच आहेतपण कोणीच स्वतः जळत नाही !!!ज्याचा घाव न् घाव,ठेवला आहेस काळजात जपूनत्याचा मात्र तुझ्यासाठीएकही अश्रू ढळत नाही ...वेडीच आहेसतुला कसं गं काहीच ठाऊक नाही ??हे जगच पारध्यांचेयेथे कोणीच भाऊक नाही !!!!समजून घ्यावी कोणीतुझ्या काळजातली कळ ?तुझ्या सारखी कोणाचीहीवेदना घाऊक नाही !!वेडीच आहेसकशी गं त्याला 'विसरत' म्हणून नाहीअजूनही त्याच्या शिवायदुसरी 'हसरत' म्हणून नाही ...एकांतात आसवांशीसारखं हितगूज करतेस म्हणे !लोकांसमोर मात्रअश्रुंचा तोल घसरत म्हणून नाही !!वेडीच आहेसअजूनही स्वतःलाच दोष देते .रेशीम वेळी मनालाआठवांचा कोष देते !!साळसूद पणे निघून जाणार्याचीअडचण असेन काही .....असे समजूनघटके पुरता मनास तोष देते !!!वेडीच आहेसआता तरी उघड्या डोळ्यांनी जग बघ ...आयुष्या वर ओढवून घेतलेलेविरहाचे ढग बघ !!!तू ही सगळ्यांसारखी'Practical' होऊ शकतेस ...एकदा तरी तुझ्यामधलीआजमावून रग बघ !!!एकदा तरी तुझ्यामधलीआजमावून रग बघ !!!

No comments: