Saturday, November 1, 2008

अर्धी रात्र

रात्र चांगली अर्धी सरून गेल्यावर मी एक कटिंग (पण )पटियाला पेग सारखी भरून घेतो तू फोडलेला एश ट्रे समोर आ वासून उभा तेंव्हा त्याच्या तोंडी एक सिगारेट देतो सुरु होतो मग एक घोट एक झुरका ...खिडकीच्या फुटलेल्या काचेतून मग आभळाला हात जातो.सिगारेट च्या धुरांच्या ढगात मग पावसाचा शोध होतो हळु हळु मग पेला गरीब अन एश ट्रे श्रीमंत होत जातोमग तुझ्या आठवनीचा खेळ सुरु होतो सिगारेट चे गरम श्वास धुरातुंन मग सर्वत्र तुझे चित्र रेखाटतात ..त्यातून सुटलेले क्षण मग कागदाला चिकटतात .पेल्यातली की सरना-या रात्रीची पण डोक्यात शिरत जाते एक नशा मिळत जाते मग एक प्रवासाला वेगळिच दिशा ......हळु हळु मग एक एक करून तुझी आठवण सतावत जाते अन मग रात्रच सोबत जागत जाते हळु हळु मनातल सार कागदावर उतरत जाते आणि मनात तुझी आठवण जागत येते ..इतक्यात दारावर एक थाप पड़ते अन मग माझी धांदल उड़ते एश ट्रे लपवायचा कुठे ?थोड्या वेळात त्याला लपउनमी दार हळूच उघडतो तू दाराशी उभी तुला मी आत घेतो ...घरात साचलेला धुर बघून तू काही विचारणार इतक्यात मी कछवा मछर अगरबत्तिच नाव घेतो .टेबलावरचा ग्लास नाकापाशी नेत मी प्यायलो काय ?याचा तू अंदाज घेत मला जवळ घेते केसात हात फिरवत माझ गीत गात रहाते....इतक्यात शेजारच आलार्म च घड्याळ सकाळ झाल्याच केकाटत जाते मी आपला डोळे चोळत उठतो बघतो तर पेन कानाला टेबलावर ग्लास तस्साच दाराला कड़ी आतून तशीच ...मी सोफ्यावर एकटाच ..फ़क्त एश ट्रे तिथून गायब मी त्याचा शोध घेतो ..तुझे एक अजुन स्वप्न समोरच्या कागदावर त्याला फाइल लाउन देतो .सकाळी माझी हालत बघून आरसा मला हसत राहतो ....फाइल मला विचारत रहाते कधी येणार माझी सखी ???

No comments: