Thursday, August 14, 2008

एक प्रेयसी पाहिजे......

एक प्रेयसी पाहिजे......एक प्रेयसी पाहिजे......एक प्रेयसी पाहिजे, पावसात चिंब भिजणारी;अन मलाही तिच्यासोबत, भिजायला लावणारी।एक प्रेयसी पाहिजे, फुलपाखरांमागे धावणारी;फुलांचे सारे रंग उधळत, झाडांमागे लपणारी।एक प्रेयसी पाहिजे, मुग्धपणे हसणारी;माझ्या बाहूपाशात, अलगद येऊन बसणारी।एक प्रेयसी पाहिजे, कशीही दिसणारी;पण मनाने मात्र, अप्रतिम सुंदर असणारी।एक प्रेयसी पाहिजे, जिवलग मैत्रीण असणारी;आमच्या नाजुक नात्याला, हळुवारपणे जपणारी।एक प्रेयसी पाहिजे, माझ्या भावना जाणणारी;मी जसा आहे तसेच, माझ्यावर प्रेम करणारी।एक प्रेयसी पाहीजे, प्रेमाला प्रेम समजणारी;सुखा-दुःखात माझ्या, तन्मयतेने साथ देणारी।एक प्रेयसी पाहीजे........ मिळेल का अशी?

No comments: