Thursday, August 14, 2008

कुणीतरी आठवण काढतंय!!!

कुणीतरी आठवण काढतंय!!!कुणीतरी आठवण काढतंय!!!हसता हसता डोळे अलगद येतीलहीभरुनबोलता बोलता शब्द ओठी जातीलहीविरुनकावरंबावरं होण्यासारखं बिलकुल काहीनाहीरस्त्यामध्ये दिसतातच की चेहरे येता जाता"एका" सारखेच दिसू लागतील सहज बघताबघताअवतीभवती सगळीकडे तेच माणूस दिसेलसृष्टीमध्ये दोनच जीव... आणखी कुणी नसेलभिरभिरल्यागत होण्यासारखं बिलकुल काही नाहीकुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाहीमोबईल वाजण्याआधीच तो वाजल्यासारखा वाटेलजुनाच काढुन एसएमएस वाचवासा वाटेलदिवस सरता वाटत जाईल उगाचच उदासपावलोपावली जड होत जाईल बहुधा श्वासघाबरुन बिबरुन जाण्यासारखं बिलकुल काही नाहीकुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाहीजेवता जेवता जीवघेणा लागेलही ठसकाघरचे म्हणतील सारखा कसा लागतो उठता बसताचेहरा लपवत, डोळे पुसत, पाणी प्यावे थोडेबोलण्याआधी आवाजाला, सांभाळावे थोडेसांगुन द्यावं काळजीसारखं बिलकुल काही नाही"कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही

No comments: