Thursday, August 14, 2008

तुझा शब्द भिडतो मनाच्या तळाशी

तुझा रंग अंगावरी सांडलेलातुझा गंध भिनतो मनाच्या कळ्याशीतुझे ओठ गाती मुके सूर जेव्हातुझे गीत अडते , माझ्या गळ्याशीनिळा कृष्ण यावानिळी तान घ्यावानिळ्या शंकराचाहीडमरू घुमावानिळा धूर,काळिज होता निलेशीअथांगातूनी थांगनेत्री झरावानिळा रंग फ़ुलतो निळ्या आसमंतीनिळ्या पर्वतांशी निळ्या सागराशीतुझे ओठ गाती मुके सूर जेव्हातुझे गीत अडते , माझ्या गळ्याशीगुलाबी क्षणांनीगुलाबी मनालादिले स्वप्न गुलजारनाजूक भोळेगुलाबी परीलापहाटे गुलाबीमिळावे अजबगुलबकावल मळेतुझ्या मूक शब्दात शांती गुलाबीमिटावी जणू भूक सारी अधाशीतुझे ओठ गाती मुके सूर जेव्हातुझे गीत अडते , माझ्या गळ्याशीतुझा शब्द भिडतो मनाच्या तळाशीमनाच्या तळाशीमनाच्या तळाशी

No comments: