एक जंगल होतं। त्या जंगलात एक ससा रहायचा. फारच लहरी होता दिवसभर चरायाचं हिंडायचं एवढच त्याला काम. एक कासव पण होतं त्या जंगलात शांत स्वभावाचं. एकदा काय झालं ससा चालला होता रस्त्यानं तेवढ्यात त्याला कासव दिसलं आणि त्याला कासवाची फिरकी घ्याविशी वाटली म्हणुन तो कासवाकडे गेला आणि कासवाला म्हणाला की आपण एक शर्यत लावू. कासव म्हणालं बर चालेल पण करायचं काय ? ससा म्हणाला जो त्या डोंगरावर पहिल्यांदा पोहोचेल तो जिंकला. कासव म्हणाले ठीक आहे. दोघेही शर्यतीला तयार झाले. १,२,३ म्हणुन शर्यतीला सुरुवात झाली आणि ससा टूनुटूनु उडया मारित धावत सुटला आणि कासव मात्र हळूहळू चालत राहिलं. ससा फार दूर पोहोचला आणि एके ठिकाणी थांबला त्याला तिथं हिरवंगार गवत दिसलं, सश्यानी विचार केला कासव कितीही जलद चाललं तरी त्याला ईथं पोहोचायला फार वेळ लागेल, तेव्हा आपण या गवताचा थोडा फडशा पाडुयात आणि मग परत धावुयात. त्याप्रमाणे ससा गवत खाऊ लागला, गवत खाऊन त्याचं पोट भरलं आणि त्याला आळस आला म्हणुन तो जरा सावलीत पडला त्याला चांगलीच गाढ झोप लागली. कासव आपलं हळूहळू चालत होतं आणि ते पोहोचलं सश्यापाशी त्यानं पाहिलं की ससा गाढ झोपलाय ते आणि ते तसच शांतपणे पुढं निघून गेलं. आणि डोंगराकड़े वाटचाल करत राहिलं. संध्याकाळ होत आली होती आणि ईकडे सश्याला जाग आली त्यानी पाहिलं आणि म्हणाला अरे बापरे फारच उशीर झालेला दिसतोय कासव निघून गेलं काय पुढं? दुस-याच क्षणाला त्याला वाटलं की कासव एकतर मंद ते काय जाणार आहे आपल्या पुढं आणि तो डोंगराच्या दिशेने धावत सुटला. जसा तो डोंगरावर पोहोचला तो चमकलाच कारण कासव तिथं कधीच येउन बसलं होतं आन ससा शर्यत हरला होता.ईथ पर्यंतची गोष्ट तुम्हाला माहितच आहे आता ह्यापुढची सांगतो.मग सश्यान् चिंतन केलं मनन केलं की आपण का हरलो, याचं कारण शोधलं आणि तो परत कासवाकडे गेला आणि म्हणाला की आपण परत शर्यत लावू, कासवही तयार झालं आणि मग त्यानी शर्यतीला सुरुवात केली पण यावेळी ससा अजिबात कुठं थांबला नाही सरळ डोंगरावर जाउनच थांबला आणि त्यानं कासवाला हरवलं त्याला फार फार आनंद झाला होता. मग कास्वान् चिंतन केलं, मनन केलं आणि तो सश्याकडे गेला आणि म्हणाला की आपण परत एकदा शर्यत लावू ससा त्याला म्हणाला "तू मला काय वेडा समजलास का? एकदा हरलो म्हणजे काय परत परत थोडेच हरणार आहे मी." कासव त्याला म्हणाले लावून तर बघ, सश्याने विचार केला ह्याला हराय्ची फार हौस आलेली दिसते आपलं काय जातय लावुयात शर्यत असा विचार करून त्यानं सश्याला होकार दिला पण कासव सश्याला म्हणालं की या वेळेस रस्ता मी ठरवीन, ससा म्हणाला चालेल. कासव सश्याला म्हणाला तुला ती टेकडी दिसते आहे ना तिथ पर्यंत आपली शर्यत, ससा म्हणाला चालेल आणि शर्यत सुरु झाली आणि ससा धावतच सुटला, अजिबात थांबायचं नाही असा त्यान विचारच केला होता पण पुढे गेल्यावर अचानक ससा थांबला, कासव आपलं हळूहळू चालत सश्या जवळ पोहोचलं आणि तेही थांबलं क्षणभर, पण पुढच्याच क्षणी चालु लागलं आणि कासव निघून गेलं आणि शर्यत जिंकलं. कारण जिथं ससा थांबला होता तिथं नदी आडवी आलेली होती आणि अन सश्याला पोहोतायेत नव्हतं. मग सश्यान् चिंतन केलं, मनन केलं आणि तो कासवाकडे गेला आणि म्हणाला की मित्रा "ईथून पुढं आपण दोघे आयुष्याच्या शर्यतीत असेच चालत राहू, जिथं जमीन आडवी येईल तिथं मी तुला पाठीवर घेईन आणि जिथं पाणी आडवं येईल तिथं तू मला पाठीवर घे आणि यशाच्या शिखरावर पोहोचू."
काही माणसे असतात खास
जि मैत्रीने खांद्यावर हात टाकतात,
दुःख आले जिवनात
तरीहीकायम साथ देत राहातात...
काही माणसं मात्र
म्रुगजळाप्रमाणे भासतात,
जेवढे जवळ जावे त्यांच्या
तेवढेच लांब पळत जातात...
काही माणसे ही गजबजलेल्या
शहरासारखी असतात,
गरज काही पडली तरच
आपला विचार करतात,
बाकीच्या वेळी ति सारी नाती विसरतात
काही हवे असेल स्वतःला तर तुम्हाला मित्र मित्र करतात..
मात्र काही माणसं ही
पिंपळाच्या पानासारखी असतात,
जाळी झाली त्यांची तरी मनाच्या
पुस्तकात आयुष्यभर जपून ठेवाविशी वाटता............
No comments:
Post a Comment