Tuesday, August 19, 2008

जगावं म्हणतोय

जगावं म्हणतोय
लहान होतो, मोठा होण्याची वाट बघायचो
भविष्यात तरी स्वछंद जगता येईल
म्हणुन वर्तमानात सगळयांच्या
सांगण्याप्रमाने जगायचो।
प्रार्थमिक मधुन हायस्कुल मध्ये गेल्यावर
काळा चष्मा घालुन फ़िराव म्हणतोय
एवढं वर्ष झालं की,
स्वःताच्या मनाने जगावं म्हणतोय
द्हावीच्या अभ्यासाचे चटके बसु लागले
गाँगलचे नाव काढल्यावर फ़टके बसु लागले
निदान दहावी झाल्यानंतर तरी
एखाद्या दुचाकीने फ़िराव म्हणतोय
एवढं वर्ष झालं की,
स्वःताच्या मनाने जगावं म्हणतोय
बारावीचं आयुष्यातील मला महत्व पटु लागलं
दुचाकीचं स्वप्न आपोआप डोळ्यातून हटू लागलं.
पुन्हा मोठ्या आशेने बारावीनंतर
एखाद्या बाईकवर फ़िरावं म्हणतोय
एवढं वर्ष झालं की,
स्वःताच्या मनाने जगावं म्हणतोय
दहावी झाली बारावी झाली
डिग्रीचं टेंशन सुरू झालं
बघता बघता वडीलांचाही पगार
जाउन पेनशन सुरु झालं
डिग्री झाल्यावर तरी एखद्या
मैत्रिनीसोबत फ़िरवं म्हणतोय
एवढं वर्ष झालं की,
स्वःताच्या मनाने जगावं म्हणतोय
रडत पडत डिग्री झाली उडत उडत नॉकरी आली
पुढच्या वर्षी तरी
एखदया मुलीसोबत लग्न करावं म्हणतोय
लग्नानंतर तरी
स्वःताच्या मनाने जगावं म्हणतोय
शेवटी एकदाची लग्नाची कामगिरी झाली
आई वडील, शिक्षकांची झाली आता
बायकोची गुलामगिरी आली
एखाद्या वर्षात एखाद्यं मुलबाळ व्हावं म्हणतोय
बाप झाल्यावर तरी
स्वःताच्या मनाने जगावं म्हणतोय
हळू हळू मुले झाली व्याप वाढला
ईवल्याश्या नॉकरीचाही ताप वाढला
शेवटी हात पाय हालतात तोपर्यंत
भारतभर फ़िरावं म्हणतोय
रिटायर झाल्यावर तरी
स्वःताच्या मनाने जगावं म्हणतोय
रिटायर झालो हात पायही गळाय लागले
शेवटचे क्षण आल्याचे आता मलाही कळाय लागले
पुनरजन्म झालाच तर
एखादं जनावर व्हावं म्हणतोय
या जन्मात नाही तर नाही
पुढच्या जन्मात तरी
स्वःताच्या मनाने जगावं म्हणतोय.

No comments: