Wednesday, August 13, 2008

उप-या श्वासांच जगणं....

तु मला भेटताना,माझ्याच कवितेचं रान निवडावं,मी ही त्या आभासात नेहमी,तुला माझ्या मिठीत पहावं.....
तू नेहमीच चित्राच्या चौकटीत,स्वत:ला शृंगारताना पहावं,मी ही त्या चित्राला तुझ्यासाठी,रंगाच्या विविध छटांमधे रंगवावं..
तू माझ्या संगीताच्या सुरात,हलकसं झुलून घ्यावं,तुझ्या त्या स्मितहास्यासाठी,सप्तसुरांच्या तालात तुला वर्णावं..
तूझ्यावर बरसाव्या सरी बाव-या,म्हणून मी श्रावणहरी व्हावं,अंगखांद्यावर तुझ्या बरसूनी मग,पुन्हा स्वत:ला लुप्त करावं...
कधी तुला वा-याच्या वेगात,तर कधी तुला लाटांमधे पहावं,किना-याची आठवण काढून,हात फैलावून तुझी वाट पहावं....
हे सारं असच का कल्पना विश्वात घडावं ?कधी वाटलं मला तर मी तुझ्या खांद्याविनाच रडावं?सांग सखे मला तूच आता एकदा,तुझ्याविना मी इथे रोज रोज का उप-या श्वासात जगावं...

No comments: