Tuesday, August 19, 2008

मलाही पहायचय एकदा प्रेम करुन !

मलाही पहायचय एकदा प्रेम करुन !मलाही पहायचय एकदा प्रेम करुन !शेजारच्या आळीत तिच्यासाठी थांबूनस्वःताच्याच सायकलची स्वःता हवा काढूनपॅंडल हलवत मग बसायचय रेंगाळुन.....टाकाणारे तिला आज सर्व काही सांगून.....दुरुनच बघायचय तिला चाकां आडूनविचारलं की सांगायचय पंक्चर झाली म्हणूनचालायचय सोबत मग सायकल हातात धरून.....विचारणारे तिला आता योग्य संधी बघून.......शब्दांनी राहायचय जिभेवरच चिकटूनबोलताना तिच्याशी जरा जायाचय गोंधळूनबोलायच तिनेच मग माझ्याकडे हसून.....कुणाचा रे विचार करतोयस तू अजून?नकळत त्या शब्दाने पडायचय घसरूनपहायचय तिने मग माझ्याकडे चमकूनमी मात्र तिच्या नजरेला चुकवून.....काय रे झाल हे माझ्यकडुन चुकून?तेवढ्यात एका सरीने टाकायचय भिजवूनहातातली छत्री झटकन उघडूनमाझ्यावर धरत तिनं म्हणायचय लाजून.....पहायचय रे मला एकदा प्रेम करून !

No comments: