Thursday, August 14, 2008

प्रेमात पडलं की...

प्रेमात पडलं की सारेच जणकविता करायला लागतातखरं सांगायचं तर थोडसंवेड्यासारखंच वागतात.यात काही चुकीचं नाहीसहाजिकच असतं सारंएकदा प्रेमात पडलं कीउघडू लागतात मनाची दारंमनातल्या भावना अलगद मगकागदावरती उतरतातडोळ्यांमधील आसवंसुद्धाशब्द होऊन पसरतातरात्रंदिवस तिचेच विचारआपल्याला मग छ्ळू लागतातन उमजलेल्या बरयाच गोष्टीतेव्हा मात्र कळू लागतात.डोळ्याशी डोळा लागत नाहीएकाकी रात्री खायला उठतातओठांपाशी थांबलेले शब्दकवितेमधून बाहेर फुटतातगोड गोड स्वप्नं बघत मगरात्र रात्र जागतातप्रेमात पडलं की सारेच जणकविता करायला लागतात.निव्वळ मूर्खपणाच्या गोष्टींसहीप्रेमात निरनिराळे अर्थ असतातगणित, भूगोल, व्याकरण सारीइथल्या व्यवहारात व्यर्थ असतातअंगात फाटकी बनियन असलीतरी इस्त्रीचा शर्ट घालतातजग जिंकल्याच्या तोरयातछाती फुगवून ऎटीत चालतातसभोवताली काय चाललंयकशाचच नसतं भानचालता बोलता तिचाच विचार'तिचं हसणं किती छान?'ठाणे, बोरिवलीच्या पुढेएकदाही आपण गेलेलो नसतोतरी तिच्यासाठी चंद्र-तारेतोडून आणायला तयार असतो

No comments: