Thursday, August 14, 2008

अश्रूंतही एक समाधान आहे

अश्रूंतही एक समाधान आहेवाटायला गेलं तरसमाधानातही चिंता आहेजपायला गेलं तरकाट्यांतही मखमल आहेसोसायला गेलं तरफुलां कडूनही जख्म आहेकुस्करायला गेलं तरअपयशातही नवी आशा आहेपचवायला गेलं तरयश खूपच क्षणिक आहेउमजायला गेलं तरमातीतच खरं सोनं आहेशरीर श्रमाने माखल्यावररत्नांची शेवटी मातीच होतेफुलांनी शरीर झाकल्यावरनिखाऱ्यांवर चालावं लागतंकापसावर उतानी पडल्यावरवेदनांशी स्पर्धा करावी लागतेहास्य चेहऱ्या मागे दडल्यावरकल्पना शक्तीचं प्रगती आहेविज्ञानाचे धडे चाळायला गेलं तरप्रगतीच विनाशाचं कारण आहेइतिहासाचं चंदन उगाळायला गेलं तर"त्यागा" पुढे सारचं शुल्लक आहेविचारात गीतासार साठवला तरउदार वृत्ती कधी कधी घातक ठरतेसुर्यपुत्र कर्ण आठवला तर....खरचं आयुष्य ज्या थोड्यांना कळलंत्या भाग्यवंतांचं ठीक आहेउरलेल्यांसाठी एकचं प्रश्न.... पणअगणित उत्तरांचं पीक आहे .

No comments: