Tuesday, August 19, 2008

तिथे आता कुणी रहात नाही

पाया ढासळलेला पिंपळाचा पारओढ्याच्या पल्याडचं चौसोपी घर,कुत्रही त्याच्या वाटयाला जात नाहीकारण तिथे आता कुणी रहात नाहीघुसण्याची हिम्मतच नाही कुणाचीएका भणालेल्या वाऱ्याशिवाय..तोही अधून मधून धुडगूस घालतो..मन मानेल तस्सा.. दारू पिल्यागत…पिचलेल्या भिंतीवर धडका मारतो..माजलेल्या मस्तवाल बोकडागत…त्याला पुर्वीचा माळी अडवत नाहीकारण तिथे आता कुणी रहात नाहीमोडकळीस आलेला लाकडी जीनात्याला अगदी मोजक्याच पायऱ्या…त्यातही दोनचार पेकाट मोडलेल्या..खिळ्यावर अधांतरी लोंबलेल्या..लाचार दिनवाण्या..आश्रितासारख्या..जीना खाली येतो..पण वर जात नाही..कारण तिथे आता कुणी रहात नाहीवर्षातून फ़क्त एकदा वाडा जिवंत होतो..हसण्या खिदळण्याचा आवाजही येतो…चांदण्यात रातराणीचा सुवास दरवळतो..वळचणीचा निपचीत सापही वळवळतो..चुलीची उष्णता त्यादिवसापुरती टिकतेसून तिच्यावर श्राद्धाची पोळी भाजते..कणिकदिव्याला तेल मात्र मिळत नाहीकारण तिथे आता कुणी रहात नाही

No comments: