Thursday, August 14, 2008

सांगेन पुन्हा कधीतरी..........

सांगेन पुन्हा कधीतरी.........मी किती किती तळमळलो,तुला टाळताना प्रियेमी किती किती जळलो.मी भांडलो तुझ्याशीमीपणाला माझ्या मी भुललो,काटा बनुन वाटेवरलामाझ्याच पायात सललो...येताना डोळ्यात होते आसुमाझ्याच पाउलात मी असा अडखळलो,पुन्हा फ़िरुन मी प्रियेतुझ्याच कुशीत शिरलो.....सांगेन पुन्हा कधीतरी!प्रेमात दुःखाचे महल जे सजवले मीते एक मन ज्याला दगड बनवले मीकधी कोणी दुखवु नये तुला माझ्यामुळेम्हणून जगापासुन तुझे नाव लपवले मी.ज्या आसवांनी या रात्रींना जागवले मीते दोन डोळे ज्याना नेहमी रडवले मीपण कधी तुझ्या पापण्या भिजु नयेतम्हणून जगासमोर या ओठांना हसवले मी.तुझ्यानंतर विनाकारण या देहाला जगवले मीआता हो स्वतःच्या हाकेने मृत्युला बोलावले मीउगाच तुला त्रास नको माझ्या जाण्या नतंरहीम्हणुन त्या स्मशांनाजवळ घर बनवले मी.तुझ्या विरहांत उगाचच शब्दांना सतवले मीतुझा इतिहास लिहिताना कवितांना रडवले मीतुझ्यामुळे त्यानांही आसवात भिजाव लागतम्हणुन सारे अश्रुं आता मनात साठवले मी.सांगेन पुन्हा कधीतरी.........

No comments: