Tuesday, August 19, 2008

आपली मराठ मोळी आई

आपली मराठ मोळी आई म्हणजे एक मजेदार, प्रेमळ, अस रसायन आहे*आई तुम्हाला दोन वेळां सल्ला देते. एक तुम्हाला हवा असतो त्या वेळी,व तुम्हाला नको असतो त्या वेळी सुध्धा·*आई हि अशी एकच व्यक्ति आहे, जिला तुमच्या बद्दल, तुम्हाला तुमच्या बद्दल माहित आहे त्या पेक्षा ज्यास्त माहित असत.*एखाद्या वेळी एखादी गोष्ट जर तुम्हाला माहीति नसेल,व आइला तुम्हि ती तिला विचारली अन जरी तिला ति माहीति नसली तरी ति, गोष्ट माहीति असल्यासारखी ठोकुन देते.*आई जीतकी चांगली तितके मुंले वाया जाण्याच्या संभावना जादा*अरे पावसांची चिन्हें आहेत रेनकोट घेउन जा अस ती म्हणते, तुम्हि नेहमी पणे,दुर्लक्ष करता, अन मधे कुठेंतरी नेमका तुम्हाला पाउस गाठ्तो....* तुम्ही एखादी गोष्ट विसरला, तर ति तुमच्या साऱ्या चुकांची तुम्हाला आठ्वण करून देइल ज्यामुळें तुम्ही ति चुक परत करणार नाहीत....*तुमच्या साऱ्या गोष्टीवर टीका करण्याचा तिला ह्क्क आहे,जरी त्यातली एखादी गोष्ट तुम्ही केली नसली तरी सुध्धा....*आई च्या जेवणाला नावे ठेवण्याची चुक करु नका मेल्या बाहेरच शिळ पाक घाण तेलातल मीटक्या मारत खाशील...* आई शी कधीच खोट बोलु नका अन जरी प्रयत्न केला तरी निश्चीत पकडलें जाताल·*जस जस तुमच वय वाढत जात तस तस एखाद्या लहान मुलासारख तुम्हि तिच्याशी वागायला लागता·*पैशांची कडकी असते, तिला पैसें मागा ति पैसे देइल अन,तुम्ही पैसे कसे उधळता या वर लेक्चरपण देइल·*तुम्ही कीतिहि चुका करा, ति हजार वेळा तुम्हाला त्याची आठवण करुन देइल, पण मनांत कधीच ठेवणार नाही·*तुम्ही एखादी गोष्ट केल्यानंतर[आधी नाही], ती आणखी कशी चांगली करता आली असती हे फक्त तिच सांगु शकते...*तुमची आई कीतिही गरीब कींवा अशीक्षीत असो ति तुमच्या पेक्षा नेहमीच मोठी आसते....*एखादी गोष्ट तुम्ही केली तर ति आणखी कशी चांगली करता येइल ते ती तुम्हाला सांगेल ,पण जर तीनें केली अन जर तुम्ही सांगायला गेला तर ती म्हणेंल, मग तुच का नाही करत...*तुम्ही कितिही चांगला विनोद केला तरी तिला तो विनोद नेहमीच वाह्यात वाटतो...*आइ काम संपवुन जरा बसली कि मुलाला भुक लागते।*तुम्हि मोठ होउन नांव काढाव इतकच तिला वाटत असत...

No comments: