Tuesday, August 19, 2008

तू परतून येवू नकोस

तू नकळतपणे आलीस माझ्याहृदयाच्या प्रांगणात चोरपावलानंअन् समोरुन नाही तर एकाबेसावध क्षणी,तेही मागच्या दारानंअजाणत्या वयात नाही कळालंघ्यावा कुणाचा कौल?बुद्धी नेहमीच सांगत आलीविचार कर खोलपण हृदय घसरलं कीन कळे गेला मनाचा तोलनंतर लक्षात आलं की तुलानसे या कशाचंच मोलअजुनही स्मरतोय मलातुझा तो अलवार स्पर्शअन् त्या मागोमागचंनिष्पाप, निरागस हास्यकसं विसरू मी तुझं तेमधुर निर्झर भाष्यअन् नकळतपणे बाहेरपडलेलं लाडीक "इ"खरं सांगू??, तुझं हे प्रत्येक असणंमी जपलंय वहीतल्या मोरपिसांसारखंअगदी तुझं झिडकारणंही झेललंय मीगुलाबाच्या काट्यासारखंते आठवण करुनं देतात मलाजखम अजूनही रक्तरंजीत असल्याचंजरी तूला जाणवलं असेलआताश्या, मला संवेदना असल्याचंतू परतून येवू नकोस सोंग घेऊनजसं काही झालंच नसल्याचंखरंच, मला नाही झेपायचं दुःखआणखी, हेही स्वप्न भंगल्याचं.......................

No comments: