Monday, August 25, 2008

ajun fakta ekdach

अजून फक्त एकदाचलायब्ररीबाहेरचा पिंपळ असाच,प्रत्येक संध्याकाळी सळसळून हसतो,पुस्तकांत तुझ्या आठवणींची जपून पिंपळपानं,जाळीत त्यांच्या स्वतःला मी गुंतवून टाकतो.भेलकांडलेल्या पुस्तकांच्या गर्दीत,विचारांची पानं फडफडत असतात,काना,मात्रा,वेलांट्यांचं राहत नाही बंधन,भास तुझेच शब्दाशब्दांत गप्पा मारत बसतात.झिपऱ्या सावरणाऱ्या माडाच्या कुशीत,तुझ्यामाझ्या हस्तरेषा नकळत मिसळून जातात,ओल्या वाळूच्या मिठीतून अलगद स्वतःला सोडवत,लाटाच आपल्या श्वासांची साक्ष बनून राहतात.प्रत्येक ओळ लिहून संपल्यावर वाटतं,शब्दसफर मुकी माझी इथेच आता थांबूदे,मनाजोगती मांडामांड झाली एकदा अवसानाची,की सगळं सगळं पुन्हा...अजून एकदाच सांगूदे.किनऱ्यावरच्या त्या स्वप्नांची का परत उजळणी करायची,छे! आता वास्तवाचा नवा ऋतूही अनुभवायला हवा,आयुष्याच्या या वळणावर टाकताना पुढली पावलं,हात तुझा असाच सतत हाती हवा.नवे ऋतू, नवी स्वप्नं, नव्याच दुनियेत आता बागडायचंय,नवे चटके, नवे काटे, अश्रूंनाही आता एकत्रच लपवायचंय.सावली तुझीच पुढ्यात,कायम माझ्या राहूदे,अजून फक्त एकदाच बहुतेक हेच सांगायचं आहे,आरशात जेव्हा बघशील,दिसेल माझीच प्रतिमा,श्वासाश्वासात तुझ्या आता असं नांदायचं आहे.

No comments: