Wednesday, October 20, 2010

मैत्री म्हटली की आठवतं ते बालपण

मैत्री म्हटली की


आठवतं ते बालपण

आणि मैत्रीतुन मिळालेलं

ते खरंखुरं शहाणपण



कोणी कितीही बोललं तरी

कोणाचं काही ऐकायचं नाही

कधीही पकडले गेलो तरी

मित्रांची नावं सांगायची नाही



मैत्रीचं हे नातं

सगळ्या नात्यांत श्रेष्ठ

हे नातं टिकवण्यासाठी

नकोत खुप सारे कष्ट



मैत्रीचा हा धागा

रेशमापेक्षाही मऊ सुत

मैत्रीच्या कुशीतच शमते

मायेची ती सुप्त भुक



मैत्रीच्या सहवासात

श्रम सारे विसरता येतात

पण खरे मित्र मिळवण्यासाठी

काहीदा कितीतरी पावसाळे जातात



मैत्री म्हणजे

रखरखत्या उन्हात मायेची सावली

सुखाच्या दवात भिजुन

चिंब-चिंब नाहली



मैत्रीचे बंध

कधीच नसतात तुटणारे

जुन्या आठवणींना उजाळा देउन

गालातल्या गालात हसणारे

मैत्रीच्या पावसात

मैत्रीच्या पावसात

काल म्हटलं पावसाला,

माफ कर बाबा,

आज भिजायला जमणार नाही.



मैत्रीच्या पावसात भिजून

झालोय ओलाचिंब.



न्हा‌ऊ घालतोय बघ मला

शुभेच्छांचा प्रत्येक थेंब



मित्रांची इतकी गर्दी झालीय

भिजून भिजून बघ मला सर्दी झालीय



पा‌ऊस रिमझिम हसला.

ढगांना घे‌उन क्षितीजावर जाउन बसला.



जाता जाता म्हणाला,

“काळजी नको. भिजून घे खूप.

भिजणं थांबलं की घे पुन्हा मैत्रीचीच ऊब …!

सगळ्याच गोष्टी सांगायच्या नसतात,



सगळेच अश्रु दाखवायचे नसतात,



सगळ्याच नात्यांना नाव द्यायची नसतात,



स्वप्न पुर्ण होत नाहीत म्हणुन



स्वप्न पहाणं सोडुन द्यायची नसतात,



तर ती मनाच्या एका कोपर्यात जपायची असतात

तूझं माझ्या आयुष्यात येण

तूझं माझ्या आयुष्यात येण


मैत्रीचा 'संदेश' देऊन गेलं,

निराधार झालेल्या मनाला

आधार देऊन गेलं



तूझं माझ्या आयुष्यात येण

मला क्षणोक्षणी हसवून गेलं,

हरवलेल्या बालपणाची

पुन्हा एकदा आठवण करुन गेलं



तूझं माझ्या आयुष्यात येण

मला नवजन्म देऊन गेलं

रंग विसरु पाहाणाऱ्या 'चित्रा'ला,

रंगाची आठवण करुन गेलं



तूझं माझ्या आयुष्यात येणं

मला माझं वेगळेपण दाखवून गेलं,

मैत्री ह्या नात्याची

गरज निर्माण करुन गेलं



तूझं माझ्या आयुष्यात येणं

मला खुल्या आकाशात घेऊन गेलं,

जीवनाच्या ह्या वाटेवर

खऱ्याखुऱ्या मित्राची साथ देऊन गेलं

आता मला स्वप्नाच पहायची नाही...

आता मला स्वप्नाच पहायची नाही...


मनात आलेल्या अंकुराला पालवी फुटू द्यायची नाहीये...

आता मला स्वप्नाच पहायची नाही...

आशेच्या कोणत्याही किरणला पाहून उमलायचे नाहीये

कारण आता मला स्वप्नाच पहायची नाही...



नको ती क्षण भर मिळणारी मानसं

नको त्यांचा वीत भर लाभलेला सहवास

सारी सारखी येऊन चिब करणाऱ्या त्या आठवणी

पुढच्या प्रवासात येणाऱ्या बनतात अडखाली

म्हून आता मला स्वप्नाच पहायची नाही...



मी आपला माझाच बरा

एकता आणि निवंथ

न कुणाची कुज-बूज न कसला हि त्रास

माझ्या वाटा शोधात जाणारा- मीच एकता प्रवासी



पण माहित आहे मला, दमलो कि तुझीई आठवण येयील

तू कुशीत घय्वे अशी वात पाहीन, हुळूवार पाने फुंकर मारून

दवस भास चा थकवा नाही स करशील...

शांत पाने डोळे उघडेन मी जेव्हा... तर तू नसेल जवळ...



चिब भिजलेल्या दोलांनी अजूनही स्वप्ना पहायची सोडली नाही

किती समजावले स्वताला कि आता मला स्वप्नाच पहायची नाही...

पण स्वप्नात जगणाऱ्या मनाला मात्र समजावू शकलो नाही

सांग ना तू परत येशील का ???

सांग ना तू परत येशील का ???






तुझ्या आठवणीत अडकलेले क्षण काही

पुन्हा नव्याने डोळ्यासमोर आले

पण तू मात्र अजून तिथेच का ???.........



सांग ना तू हि परत येशील का ??? (१)





माझ्या डोळ्यांत पाहताना तू थोडासा घाबरला होतास

सर्वांची नजर चुकवून तू हळूच मला पाहत होतास

पण भेटशील जेव्हा पुन्हा सख्या

परत तीच झलक दाखवशील का ???....



सांग ना परत येशील का ??? (२)





तुझ्याशी बोलताना मनात चाललेले विचारांचे काहूर

फक्त तुझ्या स्मित हसण्याने गेले सगळे विचारायचे राहून

आता तरी त्यांची उत्तरे मिळतील का???....



सांग ना परत येशील का ??? (३)





आजही तुझ्या आठवणींचा गंध मनात दरवळतो आहे

जणू काही तो मला तुझ्या येण्याची चाहूल देतो आहे

प्रेमात तुझ्या चिंब होवून नाचावे

अखेरचे हे स्वप्न माझे आता पूर्ण करशील का??? ...



सांग ना परत येशील का???

आठवतंय मला आजही...........

आठवतंय मला आजही...........

तू मला सोडवायला आला होतास

stand वरच्या त्या गर्दीतही किती एकांत भासत होता



तू एकदम नि:शब्द होतास

तुझ्या डोळ्यात खूप काही आणि माझ्या मनात

तितकेच उसासे होते



खूप काही बोलायचे होते पण......

पण शब्दच फुटके नाहीत

मी बोलावे की तुझे ऐकावे या दुविधेत

मनानेही कौल दिला नाही



मी बोलणार इतक्यात गाडी येऊन ठेपली

वेळ नियतीला साथ देते हि परंपरा

तिने काटेकोरपणे जपली



निरोप घेणारे............

अश्रूंनी भरलेले..... डोळे उगाच ओठांना हसवू पाहत होते

आणि हसवून मात्र ते भोळ्या हृदयाला फसवू पाहत होते



तू थांब म्हणाला नाहीस आणि..........

आणि मलाही थांबता आले नाही

भिजलेले मन अन जड पाऊले मग वळली गाडीकडे.........



आठवतंय मला आजही...........



क्षण-क्षणाने आपल्यातला वाढत होत अंतर

मनात धस्स होत होते विचाराने पुन्हा भेटशील की नाही नंतर.......?

पण............कुणास ठावूक होत?

आता.....

हात सुटलाय तो......तो परत न गुंफण्यासाठी

तू दुरावला आहेस ..... तो पुन्हा कधीच न भेटण्यासाठी

आणि अधुरी राहिलेय मी..... कधीच पूर्णत्व न मिळण्यासाठी

बस फक्त अधुरी...................तुझ्याविना

Friday, October 15, 2010

आता मलाही तू आठवत नाहीस...

आता मलाही तू आठवत नाहीस....... पहिल्यासारखा
तू म्हणजे...... हुंदाक्यातला एक श्वास..... गुंताल्यासारखा
खूप काही नाही पण निरागसपणे, जग विसरून जगलेले
काही क्षण आठवतात नेहमीच..........
तहानलेल्याला आशेचा किरण देतो ना त्या......मृगजळासारखा
तुझं मला माहित नाही पण.......
पण माझं प्रेम खर होत..... खरच मनापासून होत
अगदी कोमल.....फुलांमध्ये झुलणाऱ्या गंधाप्रमाणे
अगदी निरागस..... हळुवार ओठांवर खुलणाऱ्या हास्याप्रमाणे
थोड कणखर........ तू चिडला की बोलायचास ना त्या शब्दाप्रमाणे
काहीस हळवं....... तुझ्या मनातल्या भावनाप्रमाणे
खूप निर्मोही........ तुला दिलेल्या त्या अगणित गुलाबांप्रमाणे
माहीत नाही असतील का आता ते गुलाबही तुझ्याकडे
त्यांनाही दूर लोटलं असशील तू माझ्याप्रमाणे
मन म्हणतंय नाही.....मला आठवतंय तू नेहमी ते डायरीत ठेवायचास
कदाचित.....
डायरीत राहून त्याचाही विरून गेला असेल सुगंध आता... कागदासारखा
आता मलाही तू आठवत नाहीस....... पहिल्यासारखा
का फिरवलीस पाठ तू अजूनही कळाल नाही
विस्कटलेल्या प्रश्नाचं उत्तर अजूनही मिळाल नाही
खूप केला प्रयत्न तरी सगळ जग सूनच भासत
एक सत्य मात्र कळल मला.....
"प्रत्येकाच पाहिलं प्रेम हे विधिलिखित अधुरच असत"

सांग ना तू हि परत येशील का ???

तुझ्या आठवणीत अडकलेले क्षण काही
पुन्हा नव्याने डोळ्यासमोर आले
पण तू मात्र अजून तिथेच का ???.........
सांग ना तू हि परत येशील का ???

माझ्या डोळ्यांत पाहताना तू थोडीशी घाबरली होतीस
सर्वांची नजर चुकवून तू हळूच मला पाहत होतीस,
पण भेटशील जेव्हा पुन्हा सखे..
परत तीच झलक दाखवशील का ???....
सांग ना परत येशील का ???

तुझ्याशी बोलताना मनात चाललेले विचारांचे काहूर
फक्त तुझ्या स्मित हसण्याने गेले सगळे विचारायचे राहून
आता तरी त्यांची उत्तरे मिळतील का???....
सांग ना परत येशील का ???

आजही तुझ्या आठवणींचा गंध मनात दरवळतो आहे
जणू काही तो मला तुझ्या येण्याची चाहूल देतो आहे
प्रेमात तुझ्या चिंब होवून नाचावे
अखेरचे हे स्वप्न माझे आता पूर्ण करशील का??? ...
सांग ना परत येशील का???

सवय मोडली नाही !!

तु बोलली नाहीस, बरं झालं
मला तर बोलायचचं नव्हत
सगळया भावना उमजत होत्या
पण मुद्दाम नाकारलं मी प्रेम तुझं
आता प्रेमात ....
पुन्हा कुणाला घायाळ करण्याची मी सवय मोडली आहे !!!




 घायाळ बेभान बेजाण तर झालोच होतो
ना कधी जाणवू तुला दिले ना बोलू शकलो
स्व:ताच एकटा कुरतडत काळजास राहिलो
पहिलस न बोलण्याची सवय आजुन मोडली नाही !!

खरे प्रेम दूरदर्शन सारखे असते

पायी चालताना ठेच अशी लागली
सहजच मनात पाल चुकचुकुन गेली
तिनेच आठवण असेल केली
तेव्हां हृदय,आज पाय रक्तबंबाळीत करुन गेली




 जपल्यात मी ही तुझ्या आठवणी
काळजाच्या एका कोपऱ्यात
जाऊ नयेत सोडून तुझ्याप्रमाणे म्हणून
कायम ठेवतो त्यांना पहाऱ्यात




पुसणारं कोणी असेल तर
डोळे भरुन यायला अर्थ आहे
कुणाचे डोळे भरणार नसतील तर
मरण सुद्धा व्यर्थ आहे.

मरताना वाटलं
आयुष्य नुसतच वाहून गेलं
मला जगायचंय, मला जगायचंय म्हणताना
माझं जगायचंच राहून गेलं

खरे प्रेम दूरदर्शन सारखे असते
कधीही न बदलनारे
लोकांनी कितीही शिव्या घातल्यातरी
आपल्याच विश्वात रमनारे

सवय

सवय

त्या दिवशी तू लाडात
चन्द्र तारे मागितलेस
आणून ही दिले असते
पण
आजकल जरा सवय मोड़ली आहे

दिवस तुझे फुलायचे आहेत
वा-यावरती झुलायाचे आहेत
वारा बनून यायच ठरवलेही आसतं
पण
आजकल जरा सवय मोड़ली आहे

कधी गुलाबाच फुल , कधी गजरा
आणी बरेच काही मागत राहशील
खोटही बोललो आसतो एखादे वेळी
पण
आजकल जरा सवय मोड़ली आहे



 त्या दिवशी लाडात येऊन
चंद्र तारे मीही मागितले असते
पण त्यांच्याशी खेळायची
आजकाल जरा सवय मोडली आहे

दिवसेंदिवस फुलायचे होते
वारयावर झुलायचे होते
मीही ठरवले वाहून जायचे
पण
आजकाल जरा सवय मोडली आहे....

फुल आणि गजरा मागितला असता
आणि बरेच काही मागितले असते
पण खोटे बोलणार नाही
कारण
आजकाल जरा सवय मोडली आहे....

तुझ्याविना....

तुझ्याविना....
हरवलेली मी......
मला पुन्हा सापडते
त्याच वाटेवर......

वळतात पावले..
पुन्हा त्याच
नकोश्या वळणांवर..

जिथे निपचित
पडलेले सापडतात
माझे असंख्य अबोल शब्द.....
तुझ्या दुराव्याला घाबरून
शब्दात कधीच व्यक्त न
झालेली माझी वेडी प्रीत...
तुझ्या सहवासाने
क्षणभरासाठी...
बहरलेले माझे मन..
अन...
तुझ्या अव्यक्त पण मला
जाणवलेल्या नाकाराने
कुरतडलेल हृदय..

पसरलेले असते
सार काही असेच...
शांत..बिनबोभाट...

मग मीच
डोळ्यातले अश्रू थांबवत
गोंजारते,कुरवाळते काही क्षण
तू मला दिलेल्या दु:खाला...
(कि मीच मला करून घेतलेल्या ??)


मग सांजेसरती...
परतावे लागते मलाही ..
माझ्यातल्या तुझ्या अस्तित्वाच्या
ह्या उरल्या सुरल्या जाणीवा..
इथेच सोडून....
पुन्हा एकदा ...
नशिबाने उसन्या फेकलेल्या
त्या जड श्वासांना जगण्यासाठी...
कि त्यातच गुदमरून मरण्यासाठी???

एकदा ती माझ्याकडे आली..

एकदा ती माझ्याकडे आली
माझ्याबरोबर 'चल' म्हणाली,
'हो' म्हणायच्या आतंच ती
देऊन हात, घेऊन गेली

होतो सोबत आम्ही चालत
कधी शांत कधी बोलत,
पायवाट निळसर नव्हती संपत
नभी चांदणे, चंद्रासंगत

गोड गप्पा नव्हत्या थांबत
सुरेल आवाज जणू कोकिळेगत
मौनामधे भासे दिव्य एक रंगत
अनवट सूर, बासरीचे उमलत

हसताना ती बाहुली दिसायची
बारीक डोळे अलगद लाजायची,
गालांवर खळी नाजुक पडायची
नयन शिंपल्यात, जपावी वाटायची

तरूतळी एका आम्ही बसलो
मनीचे सारे तिला मी वदलो,
हात थरथरता तिच्या हातात
परि नजर थेट डोळ्यात

काय झालं पूढे सांगत नाही
स्वप्न सारं पुन्हा आठवायचं नाही,
झालो जागा तरी उठलो नाही
करत विचार पडलो मी,
प्रेमामधे तर पडलो नाही !!!! 

ओले अश्रू..

कधी येशील तू?
मी तुझी वाट बघतोय

आभाळ भरून आलंय
ढगही गडगडताहेत
माझ्या मनातला टाहो
जणू तेच व्यक्त करताहेत

बघ, त्याचा चेहरा कसानुसा झालाय
तु नाही आलीस तर
लवकरच ते रडायला लागेल
त्याच्या अश्रूंनी मलाही भावूक करेल

पण मी रडणार नाही
त्याला साथ देणार नाही

आणि
जर आलंच रडायला तर
सरळ पावसात भिजत राहीन
कोणालाच माझे अश्रू दिसू देणार नाही

कारण
माझ्या रडण्याचे बोल तुला लावलेलं
मला सहन होणार नाही

Monday, October 4, 2010

काल बाबा आले होते...

काल बाबा आले होते...


काल बाबा आले होते, बोलले नाहीत जास्त

सांजभर उशाशी माझ्या, एकटे बसून होते शांत



काही झाल नाही तुला, बरा होशील एवढ्यात

सांगताना पाहण्याचा माझ्याकडे, धीर नव्हता डोळ्यात



कधी नव्हे ते तेव्हा, माझ्या केसांना कुरवाळत होते

माझ्या अगोदर नंबर लावलास म्हणत, स्वताहा वरच राग काढत होते



ग्लासात ज्यूस ओतताना, त्यांचा हात थरथरतांना मी पाहीला

आयुष्याचा पेला मात्र, त्यांच्या प्रेमाविना रिकामाच राहिला



किंचित कड़ा ओलावल्यावर, मग मीच प्रश्न केला

तुमच्यासाठी तुमचा मुलगा, शेवटी नालायकच हो राहिला



शरीराच्या आजाराच एवढ, काय बसलात घेउन

मनातली ओली जखम, सांगा कधी यायची भरून



दगडालाही पाझर फुटावा, तसे बाबा रड रड रडले

वाईट वाटते एवढेच तेव्हा, जगण्यात नव्हते काही उरले



खुप प्रेम केल बाबा तुमच्यावर, सांगायच मात्र राहील

वाटल कधी तरी समजेल तुम्हाला, पण आता सार काही संपल



एक इच्छा आहे मनात बाबा, शेवटचा हट्टच म्हणा कदाचित

खुप दमलोय हो आता, जरा झोपायचय तुमच्या कुशीत

तू हो पुढे मी आलोच.....

तुला नेहमीच असं का वाटत


मीच इथे एकटी आणि मीच इथे दुःखात आहे....

सांगू तरी कस तुला ग

केविलवाणा झालोय मीही...

तुझ्या आठवात अडकलोय...

तुझ्या श्वासांत हरवलोय...

तुझ्या केसांत गुंतलोय...

तुझ्या जुन्याच वाक्यांत शोधतोय

नव काही...

तुझ्या जुन्याच शब्दांत सापडत आहेत...

नवे अर्थ काही...



जरी लागत नसला कशाचाच मेळ

तरी चालू आहेत मनाचे खेळ



नंतर माझा मीच मला सांगतो....



"अरे काय चाललाय तुझा बावळटपणा....

कसले अर्थ लावतो आणि काय शोधत बसतोय...

चल उठ किती काम पडली आहेत बघ..."



मला तो जे सांगतो ते पटत... पण तरी मन....चंचल....

मग माझ्याच 'मी' ला कस समजावू ते पण कळत नाही...

.....

माझ्यामाझ्यातच भांडण लावून गेलीस नं

तू एकटी तरी आहेस आणि मी.........!

......



शेवटी कंटाळून मी त्याला म्हणतो...

......

......

......

......

तू हो पुढे मी आलोच....



श्वास थोडे अडकत आहेत रे

त्यांना साठवून ठेवतो एका डबीत......तिला दाखवायला....

दोन थेंब माझ्याही गालावरून ओघळत आहेत रे....

त्यांना भरून ठेवतो शिंपल्यात...

ह्याच मोत्यांची माळ बनवून....देईन तिला एके दिवशी...



तू हो पुढे मी आलोच.....