काल बाबा आले होते...
काल बाबा आले होते, बोलले नाहीत जास्त
सांजभर उशाशी माझ्या, एकटे बसून होते शांत
काही झाल नाही तुला, बरा होशील एवढ्यात
सांगताना पाहण्याचा माझ्याकडे, धीर नव्हता डोळ्यात
कधी नव्हे ते तेव्हा, माझ्या केसांना कुरवाळत होते
माझ्या अगोदर नंबर लावलास म्हणत, स्वताहा वरच राग काढत होते
ग्लासात ज्यूस ओतताना, त्यांचा हात थरथरतांना मी पाहीला
आयुष्याचा पेला मात्र, त्यांच्या प्रेमाविना रिकामाच राहिला
किंचित कड़ा ओलावल्यावर, मग मीच प्रश्न केला
तुमच्यासाठी तुमचा मुलगा, शेवटी नालायकच हो राहिला
शरीराच्या आजाराच एवढ, काय बसलात घेउन
मनातली ओली जखम, सांगा कधी यायची भरून
दगडालाही पाझर फुटावा, तसे बाबा रड रड रडले
वाईट वाटते एवढेच तेव्हा, जगण्यात नव्हते काही उरले
खुप प्रेम केल बाबा तुमच्यावर, सांगायच मात्र राहील
वाटल कधी तरी समजेल तुम्हाला, पण आता सार काही संपल
एक इच्छा आहे मनात बाबा, शेवटचा हट्टच म्हणा कदाचित
खुप दमलोय हो आता, जरा झोपायचय तुमच्या कुशीत
जे घडेल ते सहन करायचे असतं..
13 years ago
No comments:
Post a Comment