तुझ्याविना....
हरवलेली मी......
मला पुन्हा सापडते
त्याच वाटेवर......
वळतात पावले..
पुन्हा त्याच
नकोश्या वळणांवर..
जिथे निपचित
पडलेले सापडतात
माझे असंख्य अबोल शब्द.....
तुझ्या दुराव्याला घाबरून
शब्दात कधीच व्यक्त न
झालेली माझी वेडी प्रीत...
तुझ्या सहवासाने
क्षणभरासाठी...
बहरलेले माझे मन..
अन...
तुझ्या अव्यक्त पण मला
जाणवलेल्या नाकाराने
कुरतडलेल हृदय..
पसरलेले असते
सार काही असेच...
शांत..बिनबोभाट...
मग मीच
डोळ्यातले अश्रू थांबवत
गोंजारते,कुरवाळते काही क्षण
तू मला दिलेल्या दु:खाला...
(कि मीच मला करून घेतलेल्या ??)
मग सांजेसरती...
परतावे लागते मलाही ..
माझ्यातल्या तुझ्या अस्तित्वाच्या
ह्या उरल्या सुरल्या जाणीवा..
इथेच सोडून....
पुन्हा एकदा ...
नशिबाने उसन्या फेकलेल्या
त्या जड श्वासांना जगण्यासाठी...
कि त्यातच गुदमरून मरण्यासाठी???
जे घडेल ते सहन करायचे असतं..
13 years ago
No comments:
Post a Comment