आता मलाही तू आठवत नाहीस....... पहिल्यासारखा
तू म्हणजे...... हुंदाक्यातला एक श्वास..... गुंताल्यासारखा
खूप काही नाही पण निरागसपणे, जग विसरून जगलेले
काही क्षण आठवतात नेहमीच..........
तहानलेल्याला आशेचा किरण देतो ना त्या......मृगजळासारखा
तुझं मला माहित नाही पण.......
पण माझं प्रेम खर होत..... खरच मनापासून होत
अगदी कोमल.....फुलांमध्ये झुलणाऱ्या गंधाप्रमाणे
अगदी निरागस..... हळुवार ओठांवर खुलणाऱ्या हास्याप्रमाणे
थोड कणखर........ तू चिडला की बोलायचास ना त्या शब्दाप्रमाणे
काहीस हळवं....... तुझ्या मनातल्या भावनाप्रमाणे
खूप निर्मोही........ तुला दिलेल्या त्या अगणित गुलाबांप्रमाणे
माहीत नाही असतील का आता ते गुलाबही तुझ्याकडे
त्यांनाही दूर लोटलं असशील तू माझ्याप्रमाणे
मन म्हणतंय नाही.....मला आठवतंय तू नेहमी ते डायरीत ठेवायचास
कदाचित.....
डायरीत राहून त्याचाही विरून गेला असेल सुगंध आता... कागदासारखा
आता मलाही तू आठवत नाहीस....... पहिल्यासारखा
का फिरवलीस पाठ तू अजूनही कळाल नाही
विस्कटलेल्या प्रश्नाचं उत्तर अजूनही मिळाल नाही
खूप केला प्रयत्न तरी सगळ जग सूनच भासत
एक सत्य मात्र कळल मला.....
"प्रत्येकाच पाहिलं प्रेम हे विधिलिखित अधुरच असत"
जे घडेल ते सहन करायचे असतं..
13 years ago
No comments:
Post a Comment