मैत्रीच्या पावसात
काल म्हटलं पावसाला,
माफ कर बाबा,
आज भिजायला जमणार नाही.
मैत्रीच्या पावसात भिजून
झालोय ओलाचिंब.
न्हाऊ घालतोय बघ मला
शुभेच्छांचा प्रत्येक थेंब
मित्रांची इतकी गर्दी झालीय
भिजून भिजून बघ मला सर्दी झालीय
पाऊस रिमझिम हसला.
ढगांना घेउन क्षितीजावर जाउन बसला.
जाता जाता म्हणाला,
“काळजी नको. भिजून घे खूप.
भिजणं थांबलं की घे पुन्हा मैत्रीचीच ऊब …!
सगळ्याच गोष्टी सांगायच्या नसतात,
सगळेच अश्रु दाखवायचे नसतात,
सगळ्याच नात्यांना नाव द्यायची नसतात,
स्वप्न पुर्ण होत नाहीत म्हणुन
स्वप्न पहाणं सोडुन द्यायची नसतात,
तर ती मनाच्या एका कोपर्यात जपायची असतात
जे घडेल ते सहन करायचे असतं..
13 years ago
No comments:
Post a Comment