Thursday, August 13, 2009

" I LOVE YOU "

कोणाच्या तरी येण्याने आयुष्यच कधी कधी बदलून जातं आपलं सारं जगच त्यांच्याभोवती फिरू लागतं जिवंत राहणं आणि एक एक क्षण जगणं यातला फरक समजू लागतो नाही नाही म्हणता आपणही प्रेमात पडू लागतो कधी हसणं विसरून गेलो तर ते हसायला शिकवतात जीवन हे खऱ्या अर्थाने जगायला शिकवतात पण एक दिवस जेव्हा ते दूर निघून जातात.... आपलं आयुष्यच अर्थशून्य वाटू लागतं त्यांच्या गोड आठवणींमधे वेडं मन झुरू लागतं कारण प्रत्येकालाच गरज असते एका साथीदाराची, प्रत्येक क्षणाला प्रीतीच्या रंगात रंगवण्यासाठी त्याच्या गोड गुलाबी स्वप्नात हरवण्यासाठी म्हणूनच ........ असेल जर कोणी असं खास तुमच्याजवळ जाऊ देऊ नका त्यांना कधी दूर एकदा जवळ घेऊन म्हणून तर बघा " I LOVE YOU "

विसरु नकोस तू

विसरु नकोस तू मला इतकेच सांगणे आहे तुला विसरु नकोस तू मला नहीं जमल फुलायाला हरकत नाही कोमेजुन मात्र जावू नकोस माझ्या प्रीत फुला इतकेच सांगणे आहे तुला विसरु नकोस तू मला नाही जमणार परत कधी भेटायला नाही जमणार एकमेकांना पहायला हरकत नाही इतकेच सांगणे आहे तुला टालू नकोस तू मला शेवटचच आहे हे भेटण घडणारच आहे ह्रुदयाचे तीळ तीळ तुटण नियतीनेच ठरविले आहे आपल्याला असे लुटण इतकेच सांगणे आहे तुला जपुन ठेव आठवणीना नाही नियमितपणे त्यात रमता आले हरक़त नाही पण विसरु नकोस तू मला!

ती किती वेडी आहे

ती किती वेडी आहे,एवढी शी गोष्ट तिला समजली नाहीमी किती वेडा आहे,मला एवशी शी गोष्ट सांगता आली नाहीती किती वेडी आहे,डोळ्यातल्या भावना तिला काळात नाहीमी किती वेडा आहे,तिच्या डोळ्यातच पाहत नाहीती किती वेडी आहे,प्रत्येक गोष्ट निरखून पाहतेमी किती वेडा आहे,प्रत्येक गोष्टीत तिला पाहतोती किती वेडी आहे,प्रत्येक गोष्टीवर रगवतेमी किती वेडा आहे,मला तीच रागवन् ही आवडतती किती वेडी आहे,उद्या तीच लग्न आहेमी किती वेडा आहे,तिच्या लग्नाची तयारी करतोय

एक क्षण

काळ्याभोर केसांत तुझ्याक्षणभर तरी बुडु डेकेसांच्या बटा सावरतानाआज तुला पाहुदेहास प्रिये एकदाच मलाक्षणभर तरी जगु देहात तुझा हातात आल्यावरस्मित ओठांवर पसरु देगजरा माळतांना केसांत तुझ्यामीच फुल बनुन फुलु देहास प्रिये एकदाच मलाक्षणभर तरी जगु देहोईन तुझसाठी फुलपाखरुतुझ्या तळव्यावरी बसुदेहोईन घन निळा मीतुला चिंब करुन जाऊदेहास प्रिये एकदाच मलाक्षणभर तरी जगु देहोईन तान मी त्या कान्हाचीतुला गुंग करुनी जाऊदेहोईन मोरपीस मी तुझसाठीवा-यावरी मज ऊडु देहास प्रिये एकदाच मलाक्षणभर तरी जगु देनेहमीच तुमचाच

आता काही बोलू नकोस

आता काही बोलू नकोस या एकांताला बोलू देवादळानंतर विसावलेल्या आसमंताला बोलू देद्वैत आणि अद्वैताच्या सीमेवरती स्थिरावलेलीही स्पंदनांची भाषा वायूमुळे चालत आहेशब्दंची कास केव्हाच सुटली आता स्पंदनेही लंघून जाऊमग निर्वातासही व्यापून उरेल त्या अनंताला बोलू दे.आता काही बोलू नकोस या एकांताला बोलू दे

अनामिका - मुलींच्या नावावर कविता...

कवितेला मी माध्यम बनवूनएकच अर्चना माझी जाणूनकोणासमोर आणू दर्शनाप्रकट करतोय माझी भावना.प्रेरणा कुठे दिसत नाही स्वप्नासाठी जगतोय मीच माझी प्रतिमा पाहून जगी स्नेहाची ओळख देतोय रेशमाचे जुने नाते अभिलाषा मनात आणतेआठवून ती निवेदिता प्रचिती रसिका येते प्रीतिने मज फूल द्यावे तृप्तीने नयनात झुलावे कोमल सरोज सुन्दर असुनही प्रजक्ताला जवळ घ्यावे कल्पना कल्पिता मानसी चांदण्यात कृतिका हसली संगीताशी इतकं नातं जुळलं की सीमा सोडावी लागली विणाने वेडं केलं मैफिलीत शोभा आली मग मेघाने घोळ घातला आणि रुचा निघून गेली श्रद्धा आलो घेउन ओढ़ लागली भक्तीची मनात माझ्या पूजा ठेवून वाट पाहिली आरतीचीअमृताचा शोध घेतांना संजीवनी जीवनी आली समृद्धीच्या नादात शांती विसरावी लागली आधी विद्या मग किर्तीनिशानंतर उषा जाशी आधी माया मग मोहिनी छायानंतर ज्योति जशी..... छायानंतर ज्योति जशी...

ती समोर असली की..

ती समोर असली की..ती समोर असली कीशब्द पाठमोरे होतातसांगायचे खुप असले तरीशब्दच दिसेनासे होतातपण आज मी ठरवले होतेतिला सर्व काही सांगायचेचवेडया ह्या माझ्या मनालातिच्यासमोर मांडायचेचंहसु नको पण मीआरशासमोर राहुन तयारी ही केली होतीसुरुवात नि शेवट चीपुन्हा पुन्हा उजळणी केली होतीसगळं काही आठवत असुन हीमी गप्पच होतोतिच्या हालवण्यानेभानावर आलो होतोती माझ्याकडे बघत राहिलीन मी तिच्यात हरवलोखोटं नाही बोलणार मी पण पुन्हा सर्व विसरलोती च मग बोललीनिरव शांतता मोडततुझ्या मनात काय आहेमला नाही का ते कळत..तुझ्यात मनातलं मीकधीच वाचलं होतंमाझं मन ही नकळततुझं झालं होतंआता मात्र मीघेतला तिचा हाती हातआयुष्याभरासाठी द्यायचीठरवली एकमेकांना साथआता मात्र मलासर्व काही आठवलेती समोर असली तरीआपसुकच सुचत गेले

हल्ली असा अवेळीच येतो कधी फोनआणि

हल्ली असा अवेळीच येतो कधी फोनआणि कळतच नाही बोलतय कोणबोलतच नाही मुळी पलीकडे कोणीऐकू येत रहातं फक्त डोळ्यातलं पाणी ...(१)कळताच मलाही मग थोडंसं काहीमीही पुढे मग बोलतंच नाहीफोनच्या तारेतून शांतता वाहतेखूप खूप आतून अजून काही सांगते ...(२)नदी नि शेतं नि वार्‍याची गिरकीढगाची विजेने घेतलेली फिरकीवाळूवर काढलेली पाण्याची चित्रं"तुझा" पुढे मी खोडलेला "मित्र" ...(३)टपला नि खोड्या नि रुसवे नि रागएकदा तरी सहज म्हणून शहाण्यासारखं वागहसायचे ढीगभर नि लोळून लोळूनबोलायचे थोडेच पण घोळून घोळून...(४)वडाचे झाड आणि बसायला पारथंडीमधे काढायची उन्हात धारकॉफी घेउन थोडेसे बोलायचे कडूहसताना पहायचे येते का रडू ...(५)बोलायचे गाणे आणि बोलायची चित्रंनुसतीच सही करुन धाडायची पत्रंक्षणांना यायची घुंगरांची लयप्राणांना यायची कवीतेची सय...(६)माणूस आहेस "गलत" पण लिहितोस "सही"पावसात भिजलेली कवीतांची वहीपुन्हा नीट नव्याने लिहीत का नाहीस?काय रे.... काही आठवतय का नाही?शब्दसुद्धा नाही तरी कळे असे काहीहातामधला हात सुद्धा जितकं बोलत नाही...(७)हल्ली असा अवेळीच येतो कधी फोनआणि कळतच नाही बोलतय कोणदोन्ही कडे अबोला आणि मध्यात कल्लोळछाती मधे घुसमटतात हंबरड्यांची लोळ...(८)ऐकू येतात कोंडलेले काही श्वास फक्तकोणासाठीतरी खोल दुखलेलं रक्तगरम होतात डोळे नि थरथरतो हातसर्रकन निघते क्षणांची कात...(९)उलटे नि सुलटे कोसळते काहीमुक्यानेच म्हणतो "नको... आता नाही"फार नाही... चालतो मिनिटे अवघी तीनतेवढ्यात जाणवतो जन्माचा शीणतुटत गेले दोर आणि उसवत गेली वीणडोळे झाले जुने तरी पाणी नविन...(१०)हल्ली असा अवेळीच येतो कधी फोन....

प्रेमात पडलं की..

प्रेमात पडलं की..माझं काय, तुमचं काय,प्रेमात पडलं की असंच व्हायचं!!तिचं बोलण,तिचं हसण;जवळपास नसूनहीजवळ असण;जिवणीशी खेळ करीतखोटं रूसण;अचानक स्वप्नात दिसण!खट्याळ पावसातचिंब न्हायच!माझं काय, तुमचं काय,प्रेमात पडलं की असंच व्हायचं!!केसांची बट तिनेहलूच मागे सारली...डावा हात होताकी उजवा हात होता?आपण सारखं आठवतो,प्रत्येक क्षणमनात आपल्या साठवतो!ती रुमाल विसरून गेली!विसरून गेली की ठेवून गेली?आपण सारखं आठवतो,प्रत्येक क्षणमनात आपल्या साठवतो!आठवणीचं चांदण असंझेलून घ्यायचं!माझं काय, तुमचं काय,प्रेमात पडलं की असंच व्हायचं!!तिची वाट बघत आपण उभे असतो...ठरलेली वेळ कधीच टळलेली!येरझारा घालणसुद्धाशक्य नसतं रस्त्यावर!सगल्यांची नजर असतेआपल्यावरच खिळलेली!!माणसं येतात,माणसं जातात,आपल्याकडे संशयानेरोखून बघतात!उभे असतो आपणआपले मोजीत श्वास:एक तास! चक्क अगदी एक तास!!अशी आपली तपश्चर्याआपलं त्राण तगवते!अखेर ती उगवते!!इतकी सहज! इतकी शांत!चलबिचल मुळीच नाही!ठरलेल्या वेलेआधीचआली होती जशी काही!!मग तिचा मंजूळ प्रश्न:"अय्या! तुम्ही आलात पण?"आणि आपलं गोड उत्तर:"नुकताच ग! तुझ्याआधी काही क्षण!"कालावर मात अशी!तिच्यासोबत भुलत जायचं!माझं काय, तुमचं काय,प्रेमात पडलं की असंच व्हायचं!!एकच वचनकितीदा देतो आपण!एकच शपथकितीदा घेतो आपण!तरीसुद्धा आपले शब्दप्रत्येक वेळी नवे असतात!पुन्हा पुन्हा येऊनहीपुन्हा पुन्हा हवे असतात!!साधंसुधं बोलतानाती उगीच लाजू लगते,फुलांची नाजुक गतआपल्या मनात वाजू लागते!!उत्सुक उत्सुक सरींनीआभाळ आपल्या मनावर झरून जातं;भिजलेल्या मातीसारखंआपलं असण सुगंधाने भरुन जातं!!भरलेल्या ढगासारखंमनाचं भरलेपण उधलून द्यायचं!माझं काय, तुमचं काय,प्रेमात पडलं की असंच व्हायचं!!-मंगेश पाडगावकर

सांगायचे आहे तुला

सांगायचे आहे तुला ,सुमनांचा पाऊस पडतो माझ्यावर,तूझा केवळ चुकून स्पर्श झाला कि..शमून जाते तहान कानांची,तू एक जरी शब्द बोललास कि..पूर्ण दिवस हसरा जातो माझा,तू स्मित हसलास कि..डोळे सुखावतात माझे,तू फ़क़्त पाठमोरा दिसलास कि..आता तू फ़क़्त कल्पना कर...., काय अवस्था होत असेल माझी तू दूर किंवा अदृश्य असलास कि......... ..............................................

तुझी वेडी प्रिया

कविता :तुझी वेडी प्रिया ... खरच डोळे खुप आतुर झालेत तुला पहायला अंह तुझ्या डोळ्याना भेटायला ... कान तहानलेत तुझा आवाज प्यायला... ओठ आसुसलेत तुझ्यासोबत हसल्यावर गुलाबी व्हायला ...पापण्या सजल्यात तू समोर आल्यावर लाजायला...अंग अंग अधीर झाले तुझ्या मिठीत नहायाला ...ह्रदय तुला आठवत राहत , आठवल्यावर पुन्हा एकदा तुझ्या प्रेमात पडायला....पण वेदा मेंदू सतावतो मला म्हणतो ," शिक आता क्षणभर त्याला विसरायला "....माझ वेड मन तयार होत नाही त्या वेड्याच ऐकायला ...जाऊदे मन ही वेड आणि मेंदू ही वेडा...पण हल्ली दोघानाही आवडत अस वेड व्हायला ....

च्यायला परत हिचा फोन.......,

च्यायला परत हिचा फोन........,आणि पुन्हा तेच प्रश्न,कुठे आहेस..?, कसा आहेस..?,काय करतोssssssय ..,?झाली का कामं..?कप्पाळ माझं...!,हिला समजत नाही का.., मी कधी गाडीवर असतो,कधी मीटिंग मध्ये, कधी बॉसच्या केबिनमध्ये,कुठेही वाजते हिच्या प्रश्नांची रिंगटोन,चायला, च्यायला परत हिचा फोन.......,कुठे पाळून नाही जाणार, सयंकाळी येइल न घरी,'तेव्हा विचारशीsssल जे विचारायचं ते...,सारं काही सांगेल.झालंsssssss.., रडा-रडी सुरु - , 'तू खुप बदललाय,लग्न आगोदर असा नव्हातास, माझ्यासाठी किती वेळ असायचा तुझ्याकडे, इत्यादि, इत्यादि.अगं, ' तेव्हा लपून भेटायचो, वाटायचं भेटशील की नाही, वरून घरच्यांची भीती,आता कधीही भेटलो तरी रोकनार कोण.?,च्यायला परत हिचा फोन.......,बरं दिवसातून पन्नास वेळा हिचे SMS,लव यू, मिस यू, ---- यू आणि काय काय..,SMS पाठवला, भावना पोहोचल्या मग फोन चे काय काम,तर म्हणे तुझा आवाज ऐकावासा वाटला,घे ऐक, बोलतो नाही चांगला मोठ्यानी ओरडतोच,मग बसते धारण करून मौन,च्यायला परत हिचा फोन.......,

देवा मला रोज एक अपघात कर..

देवा मला रोज एक अपघात कर - 2आणि तिच्या हातानीच - 2जखमा या भरदेवामला रोज एक अपघात कर - 2कधी तरी कुठे तरी बसावी धडक - 2कळ मला यावी तिला कळावे तडक - 2घायाळला मिलो - 2, एक घायाळ नजर हाय , देवा मला रोज एक अपघात कर - 2 देवा मला .... अपघाती सोंग माझे वाटावे खरे - 2तिला येता प्रेम मला वाटावे बरे - 2दवा दारू मध्ये - 2, कुठे असतो असर देवा मला रोज एक अपघात कर - 2 खरी व्यथा तेव्हा मग सांगेन तिला - 2 विचारेल जेव्हा कुठे दुखते तुला - 2जरा डावीकडे - 2,जरा पोटाच्या या वर देवा मला रोज एक अपघात कर - 2 टेकव आता छातीवर डोके एकवार- 2ठोका घेई झोका , उडे आभाळाच्यापार - 2व्यथान चाच काय - 2, पडे जगाचा विसर देवा मला रोज एक अपघात कर - 2 आणि तिच्या हातानीच जखमा या भर देवा मला रोज एक अपघात कर - 2

तू

तूगौरगुलाबी चर्येवर लालकेसरी टिकली टेकलेली...लालचुटुक ओठांत गडद गुलाबी गुपिते मिटलेली....लालगुलाबी वस्त्रांत सौम्य गुलाबी कांती लपेटलेली...मंद गुलाबी गंधाची एक देहकुपी लवंडलेली...सभोवताल्यांशी राखलेलं एक फिकटं गुलाबी अंतर...तू ?... छे! ... तू नव्हेसचं तू;तू तर गुलाबच्या फुलाचे भाषांतर !!

इतकी नाजुक इतकी आल्लाड

इतकी नाजुक इतकी आल्लाड फुल्पखाराहून अलवारचालू बघता नकळत होते वरवर्ती अलगद स्वार इतकी नाजुक ....... १भिजल्या देही गवाक्षतुनी चन्द्र किरण ते पड़ता चारलक्खा गोरटी रापून जाली रात्रीत एका सवाल नार २इतकी नाजुक जरा निफेनी जोर दूनी लिहिता नावगलित अली दुसर्या दिवशी अंगा अंगावर हलवे घाव इतकी नाजुक.......................३कश्या क्रूर देवाने दिधल्या नाजुक्तेच्या कला तिलाजरा जलादसा श्वास धावता त्यांच्या देखिल ज़ला तुला ............४इतकी नाजुक इतकी सुन्दर दर्पण देखिल खुलावातोटी गेल्यावारती तो क्षण भर प्रतिबिम्बाला धरु बघतो इतकी नाजुक .........५इतकी नाजुक की जेव्हा टी पावसात जाऊ बघतेभीती वाटते कारन जलात साखर क्षणात विरघलते..............६इतकी नाजुक की अत तर स्मर्नाचे भय वाटेनको रुताया फुलास आपुल्या माज्या जगान्यतिल काटे .........7

दमलेल्या बापाची ही कहाणी

(सलीलचा आवाज) पद्य:कोमेजून निजलेली एक परी राणीउतरले तोंड, डोळा सुकलेले पाणीरोजचेच आहे सारे काही आज नाहीमाफी कशी मागू पोरी मला तोंड नाहीझोपेतच घेतो तुला आज मी कुशीतनिजेतच तरी पण येशील खुशीतसांगायाचे आहे माझ्या सानुल्या फुलादमलेल्या बापाची ही कहाणी तुला....ना ना ना ना ना.. ना ना ना ना ना.....आटपाट नगरात गर्दी होती भारीघामाघूम राजा तरी लोकलची वारीरोज सकाळीच राजा निघताना बोलेगोष्ट सांगायाचे काल राहूनिया गेलेजमलेच नाही काल येणे मला जरीआज परि येणार मी वेळेतच घरीस्वप्नातल्या गावामध्ये मारू बघ खेळीखर्‍याखुर्‍या परीसाठी गोष्टीतली परीमांडीन मी थकलेल्या हातांचा झुलादमलेल्या बापाची ही कहाणी तुला....ना ना ना ना ना.. ना ना ना ना ना....(संदीपचा आवाज) गद्य:ऑफिसात उशीरा मी असतो बसूनभंडावले डोके गेले कामात बुडूनतास-तास जातो खाल मानेने निघूनएक-एक दिवा जातो हळूच विझूनअशा वेळी काय सांगू काय-काय वाटेआठवासोबत पाणी डोळ्यांतून दाटेवाटते की उठूनिया तुझ्या पास यावेतुझ्यासाठी मी पुन्हा लहानगे व्हावेउगाचच रूसावे नि भांडावे तुझ्याशीचिमुकले खेळ काही मांडावे तुझ्याशी(सलीलचा आवाज) पद्य:उधळत खिदळत बोलशील काहीबघताना भान मला उरणार नाहीहसूनिया उगाचच ओरडेल काहीदुरूनच आपल्याला बघणारी आईतरीसुद्धा दोघेजण दंगा मांडू असाक्षणा-क्षणावर ठेवू खोडकर ठसासांगायाची आहे माझ्या सानुल्या फुलादमलेल्या बापाची ही कहाणी तुला....ना ना ना ना ना.. ना ना ना ना ना... (संदीपचा आवाज) गद्य:दमल्या पायाने जेव्हा येईल जांभईमऊ-मऊ दूध भात भरवेल आईगोष्ट ऐकायला मग येशील ना अशीसावरीच्या उशीहून मऊ माझी कुशी(सलीलचा आवाज) पद्य:कुशी माझी सांगताहे ऐक बाळा काहीसदोदित जरी का मी तुझ्या पास नाहीजेवू खाऊ नाहू माखू घालतो ना तुलाआईपरी वेणी फणी करतो ना तुलातुझ्यासाठी आईपरी बाबासुद्धा खुळातोही कधी गुपचूप रडतो रे बाळासांगायाची आहे माझ्या सानुल्या फुलादमलेल्या बापाची या कहाणी तुला....ना ना ना ना ना.. ना ना ना ना ना....(संदीपचा आवाज) गद्य:बोळक्यामध्ये लुकलुकलेला तुझा पहिला दातआणि पहिल्यांदाच घेतलास जेव्हा तोंडी मऊ भातआई म्हणण्याआधीसुद्धा म्हणली होतीस बाबारांगत रांगत घेतलास जेव्हा घराचा तू ताबालुटू-लुटू उभं रहात टाकलंस पाऊल पहिलंदूरचं पहात राहिलो फक्‍त,जवळ पहायचंच राहिलं(सलीलचा आवाज) पद्य:असा गेलो आहे बाळा पुरा अडकूनहल्ली तुला झोपेतच पहातो दुरूनअसा कसा बाबा देव लेकराला देतोलवकर जातो आणि उशीरानं येतोबालपण गेले तुझे-तुझे निसटूनउरे काय तुझ्या-माझ्या ओंजळीमधूनजरी येते ओठी तुझ्या माझ्यासाठी हसेनजरेत तुझ्या काही अनोळखी दिसेतुझ्या जगातून बाबा हरवेल का गंमोठेपणी बाबा तुला आठवेल का गं सासुराला जाता-जाता उंबरठ्यामध्येबाबासाठी येईल का पाणी डोळ्यामध्येना ना ना ना ना.. ना ना ना ना ना.... --- संदीप खरे

Monday, August 10, 2009

आई......

थेंब थेंब झिरपणारा ओलावा पिंपळवृक्ष बनून उभा राहतो, मी त्याला आई अशी हाक मारतो........चला सलाम करू धन्य त्या मातेला...----------------------------------------------आई हा एक शब्द आहे असं म्हणण व्यर्थ आहे कारण त्यात आहे जे वात्सल्य शब्दात उतरवणं आहे ते अशक्य!! तरी हा एक प्रयास आहे तिच्याच वाढदिवसाला छोटीशी एक भेट आहे .. आई म्हणजे मंदिराचा उंच कळसआई म्हणजे अंगणातील पवित्र तुळसआई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणीआई म्हणजे आरतीत वाजवावीअशी लयबध्द टाळीआई म्हणजे वेदनेनंतरची सर्वात पहिली आरोळी.......मी एक चातक आहे तर ती पर्जन्यचा थेंब आहेमी अत्तर तर ती त्यातला सुगंध आहेमाझ्या आयुष्याची ती एक चित्रकार आहेअंधारात मला दिसणारा आशेचा किरण आहेकोणत्याही वादळात तग धरून राहीलेली माझ्या आयुष्यातील कल्पतरु आहेजिच्यामुळे मी, माझी कविता आहेती माझी......माझीच फक्त आई आहे.