Thursday, August 13, 2009

दमलेल्या बापाची ही कहाणी

(सलीलचा आवाज) पद्य:कोमेजून निजलेली एक परी राणीउतरले तोंड, डोळा सुकलेले पाणीरोजचेच आहे सारे काही आज नाहीमाफी कशी मागू पोरी मला तोंड नाहीझोपेतच घेतो तुला आज मी कुशीतनिजेतच तरी पण येशील खुशीतसांगायाचे आहे माझ्या सानुल्या फुलादमलेल्या बापाची ही कहाणी तुला....ना ना ना ना ना.. ना ना ना ना ना.....आटपाट नगरात गर्दी होती भारीघामाघूम राजा तरी लोकलची वारीरोज सकाळीच राजा निघताना बोलेगोष्ट सांगायाचे काल राहूनिया गेलेजमलेच नाही काल येणे मला जरीआज परि येणार मी वेळेतच घरीस्वप्नातल्या गावामध्ये मारू बघ खेळीखर्‍याखुर्‍या परीसाठी गोष्टीतली परीमांडीन मी थकलेल्या हातांचा झुलादमलेल्या बापाची ही कहाणी तुला....ना ना ना ना ना.. ना ना ना ना ना....(संदीपचा आवाज) गद्य:ऑफिसात उशीरा मी असतो बसूनभंडावले डोके गेले कामात बुडूनतास-तास जातो खाल मानेने निघूनएक-एक दिवा जातो हळूच विझूनअशा वेळी काय सांगू काय-काय वाटेआठवासोबत पाणी डोळ्यांतून दाटेवाटते की उठूनिया तुझ्या पास यावेतुझ्यासाठी मी पुन्हा लहानगे व्हावेउगाचच रूसावे नि भांडावे तुझ्याशीचिमुकले खेळ काही मांडावे तुझ्याशी(सलीलचा आवाज) पद्य:उधळत खिदळत बोलशील काहीबघताना भान मला उरणार नाहीहसूनिया उगाचच ओरडेल काहीदुरूनच आपल्याला बघणारी आईतरीसुद्धा दोघेजण दंगा मांडू असाक्षणा-क्षणावर ठेवू खोडकर ठसासांगायाची आहे माझ्या सानुल्या फुलादमलेल्या बापाची ही कहाणी तुला....ना ना ना ना ना.. ना ना ना ना ना... (संदीपचा आवाज) गद्य:दमल्या पायाने जेव्हा येईल जांभईमऊ-मऊ दूध भात भरवेल आईगोष्ट ऐकायला मग येशील ना अशीसावरीच्या उशीहून मऊ माझी कुशी(सलीलचा आवाज) पद्य:कुशी माझी सांगताहे ऐक बाळा काहीसदोदित जरी का मी तुझ्या पास नाहीजेवू खाऊ नाहू माखू घालतो ना तुलाआईपरी वेणी फणी करतो ना तुलातुझ्यासाठी आईपरी बाबासुद्धा खुळातोही कधी गुपचूप रडतो रे बाळासांगायाची आहे माझ्या सानुल्या फुलादमलेल्या बापाची या कहाणी तुला....ना ना ना ना ना.. ना ना ना ना ना....(संदीपचा आवाज) गद्य:बोळक्यामध्ये लुकलुकलेला तुझा पहिला दातआणि पहिल्यांदाच घेतलास जेव्हा तोंडी मऊ भातआई म्हणण्याआधीसुद्धा म्हणली होतीस बाबारांगत रांगत घेतलास जेव्हा घराचा तू ताबालुटू-लुटू उभं रहात टाकलंस पाऊल पहिलंदूरचं पहात राहिलो फक्‍त,जवळ पहायचंच राहिलं(सलीलचा आवाज) पद्य:असा गेलो आहे बाळा पुरा अडकूनहल्ली तुला झोपेतच पहातो दुरूनअसा कसा बाबा देव लेकराला देतोलवकर जातो आणि उशीरानं येतोबालपण गेले तुझे-तुझे निसटूनउरे काय तुझ्या-माझ्या ओंजळीमधूनजरी येते ओठी तुझ्या माझ्यासाठी हसेनजरेत तुझ्या काही अनोळखी दिसेतुझ्या जगातून बाबा हरवेल का गंमोठेपणी बाबा तुला आठवेल का गं सासुराला जाता-जाता उंबरठ्यामध्येबाबासाठी येईल का पाणी डोळ्यामध्येना ना ना ना ना.. ना ना ना ना ना.... --- संदीप खरे

No comments: