Thursday, August 13, 2009

तुझी वेडी प्रिया

कविता :तुझी वेडी प्रिया ... खरच डोळे खुप आतुर झालेत तुला पहायला अंह तुझ्या डोळ्याना भेटायला ... कान तहानलेत तुझा आवाज प्यायला... ओठ आसुसलेत तुझ्यासोबत हसल्यावर गुलाबी व्हायला ...पापण्या सजल्यात तू समोर आल्यावर लाजायला...अंग अंग अधीर झाले तुझ्या मिठीत नहायाला ...ह्रदय तुला आठवत राहत , आठवल्यावर पुन्हा एकदा तुझ्या प्रेमात पडायला....पण वेदा मेंदू सतावतो मला म्हणतो ," शिक आता क्षणभर त्याला विसरायला "....माझ वेड मन तयार होत नाही त्या वेड्याच ऐकायला ...जाऊदे मन ही वेड आणि मेंदू ही वेडा...पण हल्ली दोघानाही आवडत अस वेड व्हायला ....

No comments: