हल्ली असा अवेळीच येतो कधी फोनआणि कळतच नाही बोलतय कोणबोलतच नाही मुळी पलीकडे कोणीऐकू येत रहातं फक्त डोळ्यातलं पाणी ...(१)कळताच मलाही मग थोडंसं काहीमीही पुढे मग बोलतंच नाहीफोनच्या तारेतून शांतता वाहतेखूप खूप आतून अजून काही सांगते ...(२)नदी नि शेतं नि वार्याची गिरकीढगाची विजेने घेतलेली फिरकीवाळूवर काढलेली पाण्याची चित्रं"तुझा" पुढे मी खोडलेला "मित्र" ...(३)टपला नि खोड्या नि रुसवे नि रागएकदा तरी सहज म्हणून शहाण्यासारखं वागहसायचे ढीगभर नि लोळून लोळूनबोलायचे थोडेच पण घोळून घोळून...(४)वडाचे झाड आणि बसायला पारथंडीमधे काढायची उन्हात धारकॉफी घेउन थोडेसे बोलायचे कडूहसताना पहायचे येते का रडू ...(५)बोलायचे गाणे आणि बोलायची चित्रंनुसतीच सही करुन धाडायची पत्रंक्षणांना यायची घुंगरांची लयप्राणांना यायची कवीतेची सय...(६)माणूस आहेस "गलत" पण लिहितोस "सही"पावसात भिजलेली कवीतांची वहीपुन्हा नीट नव्याने लिहीत का नाहीस?काय रे.... काही आठवतय का नाही?शब्दसुद्धा नाही तरी कळे असे काहीहातामधला हात सुद्धा जितकं बोलत नाही...(७)हल्ली असा अवेळीच येतो कधी फोनआणि कळतच नाही बोलतय कोणदोन्ही कडे अबोला आणि मध्यात कल्लोळछाती मधे घुसमटतात हंबरड्यांची लोळ...(८)ऐकू येतात कोंडलेले काही श्वास फक्तकोणासाठीतरी खोल दुखलेलं रक्तगरम होतात डोळे नि थरथरतो हातसर्रकन निघते क्षणांची कात...(९)उलटे नि सुलटे कोसळते काहीमुक्यानेच म्हणतो "नको... आता नाही"फार नाही... चालतो मिनिटे अवघी तीनतेवढ्यात जाणवतो जन्माचा शीणतुटत गेले दोर आणि उसवत गेली वीणडोळे झाले जुने तरी पाणी नविन...(१०)हल्ली असा अवेळीच येतो कधी फोन....
No comments:
Post a Comment