आता काही बोलू नकोस या एकांताला बोलू देवादळानंतर विसावलेल्या आसमंताला बोलू देद्वैत आणि अद्वैताच्या सीमेवरती स्थिरावलेलीही स्पंदनांची भाषा वायूमुळे चालत आहेशब्दंची कास केव्हाच सुटली आता स्पंदनेही लंघून जाऊमग निर्वातासही व्यापून उरेल त्या अनंताला बोलू दे.आता काही बोलू नकोस या एकांताला बोलू दे
No comments:
Post a Comment