दिवस ते शाळेबाहेरील झाडाखाली बसलेल्याम्हातारीकडून ५ पैश्यात चिंचाबोरं विकत घेण्याचे;दिवस हे चकचकीत Mall मध्ये जावूनलेकीसाठी कॅडबरी,कुरकुरे विकत घेण्याचे,
दिवस ते बर्फाचे रंगीत-रंगीत थंडगारगोळे कोपरापर्यंत ओघळ येईतोपर्यंत खावयाचे;दिवस हे Dinsaw- Vadilalच्या पार्लरवरलेकीबरोबर जपत जपत कोन खावयाचे ,
दिवस ते वडाच्या पारंब्यावर्,नदीकाठावर,माळावरमोकाट खोंडागत उन्हातान्हात भटकंती करण्याचे;दिवस हे चकचकीत कारमध्ये लावलेल्याA.C. च्या थंडाव्यातून लेकीसह पिकनिकला जाण्याचे,
दिवस ते चंपक-चांदोबातील गोष्टीआठवणीने वाचण्याचे,बालगीते म्हणण्याचे;दिवस हे colourful comics बघण्याचेलेकीबरोबर powerranger,pichacho होण्याचे,
दिवस ते यात्रेतील गुलालात न्हावूनरात्री रस्त्यावरील पडद्यावर सिनेमा पाहण्याचे;दिवस हे मल्टीप्लेक्समधिल स्क्रिनवरलेकीबरोबर शहारुख्,अमीरची movie बघण्याचे,
दिवस ते दोरी लावून काडीपेटीची वाखराब टायरची गाडी करून रस्त्यावर फिरण्याचे;दिवस हे रिमोट कंट्रोलवर चालण्यार्यागुळगुळीत,चकचकीत कारबरोबर खेळण्याचे,
दिवस भल्या पहाटेची काकड-आरती,रात्रीची भजन-किर्तन जागून ऐकण्याचे;दिवस हे रेडिओ-मिर्चीवरील नविनtunes लेकीबरोबर enjoy करण्याचे,
दिवस ते दिवाळी-दसर्याचा एकच शर्टगादीखाली जपून ठेवून इस्त्री करण्याचे;दिवस हे प्रत्येक महिन्याला लेकीसाठीनव-नविन फॅशनचे ड्रेस आणण्याचे,
दिवस ते वाड्यातील सर्व मुलांनीरात्री अंगतपंगत करून एकत्र जेवण्याचे;दिवस हे फक्त आपल्याच लेकीलाघेऊन बाहेर जावून चायनीज खाण्याचे,
दिवस ते सुर-पारंब्या,लपाछपी,लंगडीवा माळावर खेळ खेळून सुट्टी घालवण्याचे;दिवस हे निरनिराळ्या व्हेकेशनमध्ये छंद वर्गालाघालून लेकीसह games व hobbies जपण्याचे,
दिवस ते वडीलांबरोबर घाबरत घाबरतआदराने दबत दबत संभाषण करण्याचे;दिवस हे मुक्तपणे गात, गप्पा मारतआपल्या लेकीचे friend होण्याचे,
दिवस ते जुने आणि दिवस हे नवे--काळाच्या गतीवर फिरण्याचे;घड्याळ तेच पण जाणवते त्यातीलकाटे बदललेले व गतीमान झाल्याचे!