बोलायाचे सारे शब्दओठांत मिटले,बांधायाचे सारे बंधक्षणांत सुटले.
नेमाचे बोलणे आताथांबले सदाचे,जपायाचे नाते आतामनात लपले.
आठवणी ओल्या गेल्याअश्रुंत वाहून,कोरडे ते अभ्र माझ्याउरात दाटले.
कठीण हे जीणे माझेकधीच नव्हते,सोपे तुझ्याविण मलानाही सापडले.-हर्षल
जे घडेल ते सहन करायचे असतं..
13 years ago
No comments:
Post a Comment