वाळु इथे खूप तापलीयथरथरणारी मी अजुन उभीयअंग तापलंय, मनही तापलंयएवढ्या सार्या अश्रुंनी तरी नाही विझलंय...कपाळावरुन पाठीवरुनघाम निथळुन रक्त गेलं पाणी बनुन.आठवण आली तुझीवार्याची मंद झुळुक जशी.जन्मा आले तेव्हापासुन तुझाच एक भागम्हणुन जपलंस तु मला,केसांनाही कधी चुकुनहीत्या तप्त उन्हाचा स्पर्श होउ दिला नाहीस.मोत्याचे दाणे भरवतानाएकेक दाणा पारखुन भरवायचीस.घरट्यांत पिसं पसरवतानामखमली पिसं मलाबोचरी पिसं स्वतःला ठेवायचीस.पंखांवर तुझ्या वादळी पाउसतुझ्या पंखाखाली मी मात्र सुरक्षित.तुझा हात पाठीवरुन,अवघा स्वर्गाचा वारा देहभर....तुझ्या शरिराचा वास,गं आई,अजुन इथं दरवळतोय सुवास्...पंख फुटले चिमण्या पाखरालातुझं चिमण गेलं दूर तुझ्यापासुन,म्हणुन का गं तुही पिलाला सोडुन गेलीस?आता नाहीत माझ्याजवळते हिरवं झाड, मखमली पिसं आणितुझे मऊ हात....आहेत मोत्याचे दाणे पण नाही त्यात तो गोडवा...माझ्याजवळ तुझ्या आठवणींची हळुवार प्रेमळ झुळुकपण भोवती,तप्त वाळु, तप्त आसवं आणि.......
No comments:
Post a Comment