कोरड्या उदास मनावर हळूवार फुंकर घालणारातुझ्यासोबत मला कुठेतरी दूर नेऊन हरवून देणारातुझ्या श्वासांचा खोडकरपणा मला रिझवतो आहे...
निराशेच्या काळोख्या रात्रीतूनआशेच्या सोनेरी पहाटेकडे घेऊन जाणारा,जीवनाच्या प्रवासात प्रत्येक पावलावरतू माझ्या सोबत आहेस याची साक्ष पटवून देणारातुझ्या स्पर्शातला प्रेमळपणा मला जगवतो आहे...
माझ्यातल्या 'मी' ला सुखावणारा,प्रेमातल्या तुझ्या समर्पणानेदेहापलीकडच्या पवित्र प्रेमाचा अनुभव देणारातुझ्या मिठीतला उबदारपणा मला फुलवतो आहे...
कधी उगीचच माझ्या ओठांवरहास्याची लकेर उमटविणारातर कधी माझ्याच नकळतमाझ्या डोळ्यांच्या कडा पाणावणारातुझ्या आठवणींचा ओलेपणा मला जळवतो आहे...
जे घडेल ते सहन करायचे असतं..
14 years ago

No comments:
Post a Comment