Thursday, February 26, 2009

चूक..

एकदा चुकलो होतो रस्ताचालता चालता नेहमीचाच...
चल म्हणाल्या, "तुला रस्ता दाखवतो"माझ्याच काही भरकटलेल्या ओळी"आम्ही फिरलोत या खाच खळग्यातूनतुच भरलीयेस आमची अनुभवाची झोळी""धन्यवाद" म्हणालो मी, म्हटलं"आता तरी मला माफ करा""लिहिता लिहिता राहिलेत बरेचसे डागशक्य असेल तर त्यांनाही जरा साफ करा"समजूतदार माझ्या ओळी, म्हणाल्या"तुझं आमच्याशी कुठे वैर होतं,आमची खंत इतकीच की,तुझं लेखणीवर नाही, कागदावर प्रेम होतं"

No comments: