Thursday, May 19, 2011

जे घडेल ते सहन करायचे असतं..


जे घडेल ते सहन करायचे असतं, बदलत्या जगाबरोबर बदलायचं असतं

आयुष्य असचं जगायचं असतं



कुठून सुरु झालं हे माहीत नसलं तरी, कुठतरी थांबायचं असतं,

आयुष्य असचं जगायचं असतं



कुणासाठी काहीतरी निस्वार्थपणे करायचं असतं, स्वत च्या सुखापेक्षा इतरांना सुखवायचे असतं

आयुष्य असचं जगायचं असतं



दु ख आणि अश्रुंना मनात कोडुन ठेवायचं असतं, हसता नाही आलं तरी हसवायचं असतं,

आयुष्य असचं जगायचं असतं



पंखामध्ये बळ आल्यावर घरटं सोडायचं असतं, आकाशात झेपावुनही धरतीला विसरायचं नसतं,

आयुष्य असचं जगायचं असतं



मरणानं समोर येउन जीव जरी मागितला तरी मागुन मागुन काय मागितलसं असचं म्हणायचं असतं,

आयुष्य असचं जगायचं असतं



इच्छा असो वा नसो जन्मभर वाकायचं असतं, पणं जग सोडताना मात्र समाधानानं जायचं असतं,

आयुष्य असचं जगायचं असतं



आयुष्य असचं जगायचं असतं............

ओळख नसते पाळख नसते,

ओळख नसते पाळख नसते,


असे आपणास कोणीतरी भेटते ,

मग एकमेकांची ओळख पटते,

त्याची आपली गट्टी जमते,

एकमेकांच्या मनातील भाषा कळते,

...इकडे-तिकडे मन वळते,

इतकी मग पक्कड बसते,

सहज तोडणे अवघड असते,

दूर रहाणे असह्य होते,

का असे हे नाते असते,

अशीच हि न तुटणारी जन्मोजन्मीची "मैत्री " असते

प्रेम तुझं खरं असेल तर...

प्रेम तुझं खरं असेल तर


जीव तुझ्यावर ओवाळेल ती

स्वत:च्याचं भावनांचं मन

शेवटी ती मारेल तरी कीती..



भावना तुझ्या शुद्ध असतील, तर

तीही त्यात वाहून जाईल

मनावर अमृत सरी झेलत

तीही त्यात न्हाहून जाईल..



विचार तुझा नेक असेल, तर

तीही तुझा विचार करेल

हृदयाच्या तिच्या छेडून तारा

सप्तसूरांचा झंकार उरेल..



आधार तुझा बलवान असेल, तर

तीही तूझ्या कवेत वाहील

मग, कितीही वादळं आलीत

तरी प्रित तुमची तेवत राहील..



आशा सोडण्या इतकं

जिवन निराशवादी नाही रे

तिला न जिंकता यावं इतकं

मानवी हृदय पौलादी नाही रे..



पण, मित्रा जर ती नाहीचं आली

तरीही तू हार मानू नकोस

तू तर प्रामाणिकपणे खेळलास

आयुष्याला जुगार मानू नकोस..



शेवटी आयुष्य हे वाहतचं राहतं

थांबत नाही ते कोणासाठी

घे भरारी पुन्हा गगनी

नव्यानं कुणीचा तरी होण्यासाठी.

.........

एक विनंती आहे......

एक विनंती आहे


दुरच जायच असेल तर

जवलच येऊ नका,

busy आहे सांगुन टालायाच असेल

तर वेळच देऊ नका

......एक विनंती आहे

साथ सोडून जायचच असेल तर

हाथ पुढे करुच नका ,

मनातून नंतर उतरायचच असेल तर

मनात आधी भरूच नका

एक विनंती आहे

अर्ध्यावर सोडून जायचाच असेल तर

आधी डाव मांडूच नका,

एक विनंती आहे

सवयीच होइल म्हणुन तोडायच असेल तर

कृपया नात जोडूच नका ,

फाडून फेकून द्यायच असेल तर

माझ्या मनाच पान उलगडूच नका.

Wednesday, May 18, 2011

तुझ्या नयनांच्या अग्नीमध्ये सजनी

तुझ्या नयनांच्या अग्नीमध्ये सजनी


मला प्रेमयद्य करावेसे वाटते

तुझ्या गोड हास्याच्या लहरींसंगे

मला वाहुन जावेसे वाटते....

तुझ्या मनाच्या कोण्यात हरवलेल्या

जाणीवांना पुन्हा जागवावेसे वाटते....



नको तु रुसुन बसु अशी सजनी

मनाच्या त्या काटेरी कुंपणाशी

तोडुन टाक आज बंधने सगळी

मिळुन जा नदी बनुन सागराशी

तुझ्या दगडधोंड्यांच्या मार्गामधले

सगळे अडथळे हटवुन द्यावेसे वाटते...



तुजविन अधुरा आहे खेळ सावल्यांचा

तुझ्या विरहाचे दु:ख उन्हापरी चटके

मोत्यांचे ते चमकणे खेळ शिंपल्यांचा

कोहिनुर मन माझे तुझ्यासाठी भटके

ना सावली ना शिंपले तुच माझे आपले

तुला पुन्हा आपलेसे करावेसे वाटते

तिने कुणावर प्रेम करावं हा तिचा प्रश्न होता,

तिने कुणावर प्रेम करावं हा तिचा प्रश्न होता,


तिच्या राधारूपी मनाचा वेगळाच कृष्ण होता.

तिच्या कक्षाच अमर्याद होत्या अन वेगवान गती,

माझे क्षितिजच होते तोकडे, अगदी हाताच्या अंतरावरती,

अन जीवनात चालण्याचा मार्गही भिन्न होता.

पण तिने कुणावर प्रेम करावं हा तिचा प्रश्न होता.



तिच्याकडे बुद्धी होती, चातुर्य होतं,

रुपाची अन धनाची तर श्रीमंती होती,

माझ्याकडे बुद्धी सोडून इतर सगळ्याची नापसंती होती,

मग का वळवावे मत तिने तिचे,

हा परखडतेचा बाण तिचा तीष्ण होता.

पण तिने कुणावर प्रेम करावं हा तिचा प्रश्न होता.



यावे तिने कधीतरी अन बोलावे जरा गोड,

हसताना दाबावी लाजेने डाळिंब फोड,

द्यावा हातात हात, सांगावी जन्माची साथ,

पण ती बुद्धीनेही जरा हुशार होती व्यवहारात,

तिने कसे मावावे माझ्या तुटपुंज्या प्रवाहात(पगारात),

समजत होते सारे तरी प्रीतीचा भाव मनी सूक्ष्म होता.

पण तिने कुणावर प्रेम करावं हा तिचा प्रश्न होता.



मी कवटाळायचो जेव्हा तिच्या आठवांना,

ती वेगळ्याच बाहुपाशात असायची,

खरंतर मी संपायचो साऱ्यातून जिथून,

तिथून तिची सुरुवात व्हायची.

ती कोमलस्पर्शी, नाजूक नयनी,

सुवर्णकांती अप्सरा माझी नव्हती,

हा वास्तव मला मान्य होता.

पण तिने कुणावर प्रेम करावं हा तिचा प्रश्न होता.

मैत्री वाचून रडते.....

मैत्री वाचून रडते , मैत्री पासून हसते...


कळत नाही मला तू आशी का वागते..

मैत्री आस्ते दोन जीवाची जोडी..

त्यात फुलायची आस्ते सुंदरशी गोडी...

एक फुल तुटल म्हणून अशी का रुसते ..

नवे उमलणारे फुल आहे तुच्या अवती भवती ..

गोडी तीच आहे , मैत्री हि तीच आहे कधी आजमावून बघ..

तुझ्या कोमल पायाखालील काटे , स्वताच्या पाई घेणाऱ्या या मित्राला कधी समजून तर बघ...

रोज किती तू त्रास करून घेशील ..

ऐका मैत्रीच्या आठवणीत तू कितीना दुखावाशील...

थोडासा विचार कर , मनाला स्थिर कर ...

किती वेळ समजावशील त्याला , कधीतरी माझा विचार कर...

तुझ्या डोळ्यातील आश्रू बघवत नाही मला..

बघ त्या सूर्याकडे , तो सांगतोय काहीतरी तिकडे ...

" तुझी नृत्य कला हीच तुझा लक्ष्य आहे "

या कलेपाई तू विसर मला हि, तुच्या ध्येयाच्या पलीकडे , कारण ..

कळत नाही मला तू आशी का वागते

प्रेम असावं निरपेक्ष, आभाळासारखं निरभ्र

प्रेम असावं निरपेक्ष, आभाळासारखं निरभ्र


जीव ओतून केलेलं, निर्मळ आणि शूभ्र



मावळत्या सूर्यासारखी ऊबदार असावी सोबतीची जाणीव

सगळे आसपास असले तरी भासावी एक उणीव



सागरासारखा अथांग असावा विश्वास

दुसर्‍यासाठीच घ्यावा आयुष्याचा प्रत्येक श्वास



हातातून वाळूसारखे निसटून जातात क्षण

अलगद हात हाती येतो सलते एक आठवण



मनाच्या शिंपल्यात जपावा आठवणींचा मोती

अशीच फुलत रहावी साताजन्मांची नाती

क्षण ते आठवले , तुझ्या माझ्या भेटीमधले

क्षण ते आठवले , तुझ्या माझ्या भेटीमधले


तुझी तार जुळली होती , माझ्या कावित्येच्या ओळीमध्ये

आज कविता करतो , आठवून तुज रूप चंद्राच्या कोरी मध्ये

तुझा आवाज एकूण मन फिरत गगणामध्ये

तुझे दोन शब्द ऐकण्यासाठी रोज धडपडतो

तुला भेटण्यासाठी रोज तुला मी एक फोन करतो

तू फोन तर उचलत नाही व उत्तर हि देत नाही

तसाच समजावतो मनाला, व निघतो घरच्या वाटेला ...



वाटेवरच्या मंदिराच्या पायऱ्या अनोळखी होत्या मला

रोज संगती जायचो त्य मंदिरात , ज्यात होता तुझा जिव्हाळा

तू होती संगती तेव्हा विश्वास होता माझा हि तिच्या वरती

आता दुरूनच पाहतो त्या मंदिराच्या कळसावरती

जाता जाता त्या मंदिराच्या पायऱ्या पाहतो

त्या पायऱ्या वरती तू माझी वाट बघत बसायची तो क्षण आठवतो

क्षणभर त्याच जागेवर थांबतो , डोळ्यातील अश्रुना घट्ट धरतो...

तसाच समजावतो मनाला, व निघतो घरच्या वाटेला...



वाटेवरती एक वळणदार रस्ता येतो , तो माझ्या साठी खूप लांब लांब जातो

त्या वाटेवरती तासान तास फिरत होतो , तुला घरापर्यंत सोडत होतो

तुला जड पाउलांनी निरोप देत होतो , तुझी विचार पूस करत होतो

आता तुझी माझी भेट तर होत नाही , तुझ्या भेटीचा अंत मला पाहवत नाही

त्या वाटेवरती , तुझ्या आठवणीच्या भोवती , एकटा फिरतो त्य रास्त्यावर्ती

हाताच्या घड्याळाकडे पाहतो ,क्षणभर थांबतो ....

तसाच समजावतो मनाला, व निघतो घरच्या वाटेला ...

तुझी माझी मैत्री म्हणजे एक परीस,

तुझी माझी मैत्री म्हणजे एक परीस,


स्पर्श करील ज्याला, होईल त्याचे सुवर्ण,

तुझी माझी मैत्री म्हणजे पुरण पोळी,

वरून कितीही भाजली, तरी आतून गोड पुरण,



तुझी माझी मैत्री म्हणजे एक गुलाब,

काटे कितीही असले, तरी दरवळे सुगंध,

तुझी माझी मैत्री म्हणजे एक ज्योत,

अंधार कितीही असला, तरी तेवत राहे मंद,



तुझी माझी मैत्री म्हणजे एक दोरखंड,

कितीही ताणली गेली, तरी बांधून ठेवे एकसंध,

तुझी माझी मैत्री म्हणजे फुलपाखरू,

जीवन जरी थोडे, प्रत्येक क्षणाचा घेई आनंद,



तुझी माझी मैत्री म्हणजे एक सूर्य,

स्वतः जळत राही, दुसऱ्या देई प्रकाश,

तुझी माझी मैत्री म्हणजे रम्य पहाट,

अंधार क्षणात संपवी, दावी निळेभोर आकाश...

एक नाते असते मैत्रीचे,

" एक नाते असते मैत्रीचे,


तोडल्याने न तुट्नारे,

एक नाते असते अधिकाराचे,

अधिकाराने बोलण्याचे,

एक नाते असते मैत्रीचे,

एक मेकांच्या चूका समजुन घेणारे,

एक नाते असते विश्वासाचे,

विश्वास घात न करण्याचे,

एक नाते असते मैत्रीचे,

अंधारात ही काजव्या सारखे चमकणारे,

असेच एक नाते असु दे !!!

एक कविता तुझ्यासाठी...

एक कविता तुझ्यासाठी.....


तू दिलेल्या मैत्रीसाठी आणि मैत्रीतल्या त्या अनामिक प्रेमासाठी...!

एक कविता तुझ्यासाठी...

तुझ्या माझ्यापाशी व्यक्त झालेल्या त्या प्रत्येक अश्रुसाठी आणि खळाळून वहाणार्या तुझ्या हास्यासाठीही....!

एक कविता तुझ्यासाठी...

तुझ्यातल्या प्रौढपणासाठी आणि त्यात डोकावणार्या तुझ्या निरागस बालपणासाठी....!

एक कविता तुझ्यासाठी....

फक्त तुझ्याचसाठी....

असं.. कधी वाटलंच नव्हतं..

असं.. कधी वाटलंच नव्हतं..


मी सुद्धा.. अडखळत..

जीवनातून तू.. एवढं सहज दूर जाशील..

अनोळखी नजरेनं अशा.. माझ्याकडे पाहशील..

पाहून नंतर.. हळूच मनाशी हसशील..

असं.. कधी वाटलंच नव्हतं..



मनाच्या बागेत, भावनेचं रोपटं..

एवढ्या खोलवर जाईल..

मुळापासून उखडलं तरी..

थोडी आठवण शिल्लक राहील..

ती आठवण सुद्धा वेदनाच देईल..

असं.. कधी वाटलंच नव्हतं..



तुझी निरागसता संपून..

निष्ठुरता डोळ्यांत उरेल..

माझ्या डोळ्यांत मात्र..

काकुळतीने.. पाणी तरेल..

भयाण हे स्वप्न, कधी वास्तवातही उतरेल..

असं.. कधी वाटलंच नव्हतं..



ठसठसणारी वेदना..

तुझीच आठवण करुन देईल..

वेडं.. मनाचं पाखरु..

पुन्हा तुलाच शोधत राहील..

अवघड प्रयत्नानं त्याचा मात्र जीव जाईल..

असं.. कधी वाटलंच नव्हतं..



पुन्हा उभा राहीन..

तुझ्या पलीकडे असणाऱ्या..

अंतिम ध्येयाला पाहीन..

आयुष्य पुढचे, त्याच्या चरणांवर वाहीन..

असं.. कधी वाटलंच नव्हतं..



आयुष्याच्या पानांवर पुढे..

प्रेमाचं पर्व अधुरंच राहील..

तुझ्या उल्लेखाशिवाय माझं जीवनसुद्धा..

अपुरंच जाईल..

मरताना सुद्धा ओठांवर तुझंच नाव घेत जाईन..

असं.. कधी वाटलंच नव्हतं..



असं.. कधी वाटलंच नव्हतं..

कॉलेजला जाणार्‍या आम्ही चार चौघी

कॉलेजला जाणार्‍या आम्ही चार चौघी


चार चौघीत तो मलाच शोधायचा

मला शोधणारी त्याची नजर

माझ्या नजरेला भिडण्याची वाट पहायचा .........



कधी मी हि अलगद नजर उचलून

न बघितल्या सारखं करायची

पण त्याच्या चेहऱ्यावर फुललेलं हास्य

माझ्या मनातली गोष्ट ओळखून जायची



कॉलेज ते घर प्रवास एकटीचाच

त्याला चुकउन मी निघायची

पण केसातली बंड खोर फुले

रस्त्यात पडून त्याला सांगायची .............



कदाचित फुलांनाही त्याच प्रेम कळल असाव

म्हणूनच त्याला मनातल माझ्या कळत असाव

मनात काय आहे त्याला माहित होत

पण माझ मन मलाच कळत नव्हत .........



प्रेम तर माझे ही होते

हे तर त्याला हि ठाऊक होते

माझ्या लाजण्यातच

त्याच्या प्रश्नाचे उत्तर होते



सुरु झालेल्या खेळाचा

नियम एकच होता

नजरांच्या खेळात हृदयातील शब्द

ओठांवर आणून द्यायचा नव्हता



नजरेतील खेळ ते आमुचे

नजरांच्या पुढे जातच नव्हते

शब्द ही सारे आतुरलेले

ओठी येण्याच्या प्रतीक्षेत होते...



नजरेचा खेळ हा सारा

नजरांच्या सागरात बुडाला

राहिली शोधत नजर माझी

तो अचानक दिसेनासा झाला..



शोधत आहे नजर माझी..

त्याच्या परतण्याची

हृदयाचा ठोका चुकेपर्यंत

वाट पाहीन मी त्याची....नजरांच्या त्या खेळाची...

सुर नवा जुळताना.....

सुर नवा जुळताना


मन का कातर व्हावे



जुन्या नात्यांना तोडताना

डोळे का भरून यावेत



माहित होते या वळनावर

आठवन तुझीच येणार



तू दिसनार नाहिस तरीही

डोळे तुलाच शोधनार



सुर नवा जुळताना

मागे मी नं पाहनार



होय ..! मी तूला विसरनार

पण ..! माहित आहे तूला अण् मलाही



मनात कुठेतरी खोलवर तूच तू असनार