Wednesday, May 18, 2011

तुझी माझी मैत्री म्हणजे एक परीस,

तुझी माझी मैत्री म्हणजे एक परीस,


स्पर्श करील ज्याला, होईल त्याचे सुवर्ण,

तुझी माझी मैत्री म्हणजे पुरण पोळी,

वरून कितीही भाजली, तरी आतून गोड पुरण,



तुझी माझी मैत्री म्हणजे एक गुलाब,

काटे कितीही असले, तरी दरवळे सुगंध,

तुझी माझी मैत्री म्हणजे एक ज्योत,

अंधार कितीही असला, तरी तेवत राहे मंद,



तुझी माझी मैत्री म्हणजे एक दोरखंड,

कितीही ताणली गेली, तरी बांधून ठेवे एकसंध,

तुझी माझी मैत्री म्हणजे फुलपाखरू,

जीवन जरी थोडे, प्रत्येक क्षणाचा घेई आनंद,



तुझी माझी मैत्री म्हणजे एक सूर्य,

स्वतः जळत राही, दुसऱ्या देई प्रकाश,

तुझी माझी मैत्री म्हणजे रम्य पहाट,

अंधार क्षणात संपवी, दावी निळेभोर आकाश...

No comments: