Wednesday, May 18, 2011

क्षण ते आठवले , तुझ्या माझ्या भेटीमधले

क्षण ते आठवले , तुझ्या माझ्या भेटीमधले


तुझी तार जुळली होती , माझ्या कावित्येच्या ओळीमध्ये

आज कविता करतो , आठवून तुज रूप चंद्राच्या कोरी मध्ये

तुझा आवाज एकूण मन फिरत गगणामध्ये

तुझे दोन शब्द ऐकण्यासाठी रोज धडपडतो

तुला भेटण्यासाठी रोज तुला मी एक फोन करतो

तू फोन तर उचलत नाही व उत्तर हि देत नाही

तसाच समजावतो मनाला, व निघतो घरच्या वाटेला ...



वाटेवरच्या मंदिराच्या पायऱ्या अनोळखी होत्या मला

रोज संगती जायचो त्य मंदिरात , ज्यात होता तुझा जिव्हाळा

तू होती संगती तेव्हा विश्वास होता माझा हि तिच्या वरती

आता दुरूनच पाहतो त्या मंदिराच्या कळसावरती

जाता जाता त्या मंदिराच्या पायऱ्या पाहतो

त्या पायऱ्या वरती तू माझी वाट बघत बसायची तो क्षण आठवतो

क्षणभर त्याच जागेवर थांबतो , डोळ्यातील अश्रुना घट्ट धरतो...

तसाच समजावतो मनाला, व निघतो घरच्या वाटेला...



वाटेवरती एक वळणदार रस्ता येतो , तो माझ्या साठी खूप लांब लांब जातो

त्या वाटेवरती तासान तास फिरत होतो , तुला घरापर्यंत सोडत होतो

तुला जड पाउलांनी निरोप देत होतो , तुझी विचार पूस करत होतो

आता तुझी माझी भेट तर होत नाही , तुझ्या भेटीचा अंत मला पाहवत नाही

त्या वाटेवरती , तुझ्या आठवणीच्या भोवती , एकटा फिरतो त्य रास्त्यावर्ती

हाताच्या घड्याळाकडे पाहतो ,क्षणभर थांबतो ....

तसाच समजावतो मनाला, व निघतो घरच्या वाटेला ...

No comments: