तिने कुणावर प्रेम करावं हा तिचा प्रश्न होता,
तिच्या राधारूपी मनाचा वेगळाच कृष्ण होता.
तिच्या कक्षाच अमर्याद होत्या अन वेगवान गती,
माझे क्षितिजच होते तोकडे, अगदी हाताच्या अंतरावरती,
अन जीवनात चालण्याचा मार्गही भिन्न होता.
पण तिने कुणावर प्रेम करावं हा तिचा प्रश्न होता.
तिच्याकडे बुद्धी होती, चातुर्य होतं,
रुपाची अन धनाची तर श्रीमंती होती,
माझ्याकडे बुद्धी सोडून इतर सगळ्याची नापसंती होती,
मग का वळवावे मत तिने तिचे,
हा परखडतेचा बाण तिचा तीष्ण होता.

यावे तिने कधीतरी अन बोलावे जरा गोड,
हसताना दाबावी लाजेने डाळिंब फोड,
द्यावा हातात हात, सांगावी जन्माची साथ,
पण ती बुद्धीनेही जरा हुशार होती व्यवहारात,
तिने कसे मावावे माझ्या तुटपुंज्या प्रवाहात(पगारात),
समजत होते सारे तरी प्रीतीचा भाव मनी सूक्ष्म होता.

मी कवटाळायचो जेव्हा तिच्या आठवांना,
ती वेगळ्याच बाहुपाशात असायची,
खरंतर मी संपायचो साऱ्यातून जिथून,
तिथून तिची सुरुवात व्हायची.
ती कोमलस्पर्शी, नाजूक नयनी,
सुवर्णकांती अप्सरा माझी नव्हती,
हा वास्तव मला मान्य होता.

No comments:
Post a Comment