Thursday, February 10, 2011

मैत्री म्हणजे काय असतं?


मैत्री म्हणजे काय असतं?
एकमेकांचा विश्वास असतो?
अतूट बंधन असत? की
हसता खेळता सहवास असतो?
मैत्री म्हणजे मैत्री असते,
व्याख्या नाही तिच्यासाठी;
अतूट बंधन नसत,
त्या असतात रेशीमगाठी
मैत्री असते पहाटेच्या दवासारखी,
थंडगार स्पर्श करणारी;
मैत्री असते केवड्यासारखी,
तना-मनात सुगंध पसरवणारी
मैत्री असते सुर्योदयासारखी,
मनाला नवचैतन्य देणारी;
मैत्री असते झाडासारखी,
उन्हात राहून सावली देणारी;
मैत्री करावी सोन्यासारखी,
तावुन-सुलासुलाखून चमचमणा;
मैत्री करावी हिर्या सारखी,
पैलू पडताच लख-लखणारी;
मैत्री असावी पहाडासारखी,
गगनाला भिडणारी;
मैत्री असावी समुद्रासारखी,
तलाचा थान्ग नसणारी;
मैत्री म्हणजे समिधा असते,
जीवन यद्न्यात अर्पण झालेली;
स्वताच्या असन्याने सुद्धा
मन पवित्र करणारी;
मैत्री हे नाव दिलय
मनाच्या नात्यासाठी;
अतूट बंधन नसत त्या असतात







तुझ्या मैत्रीचे क्षण
पुन्हा हवेहवेसे वाटू लागतात
आज मन माझं लख्ख आकाश
त्यात तुझ्या आठवांचे ढग दाटू लागतात

तुझ्या मैत्रीची गर्द सावली
अशी आयुष्यावर दाटली होती
आयुष्यातली उन्हं माझ्या
तुझ्याचमुळे आटली होती

तुझ्या मैत्रीच्या आठवणी
मी आजही जपून ठेवतो
आनंदाचे ते क्षण हरवू नयेत म्हणून
काळजाच्या तिजोरीत लपून ठेवतो

मैत्रीचं नातं तुझ्या
माझ्याशी आजन्म असच राहील
तुला ठेच लागली कधी
तर पापणी माझी वाहील

मन माझे वेडे
पुन्हा एकदा त्या क्षणांचा शोध घेतात
अन शब्द माझे कवितेतून
तुझ्या मैत्रीचा वेध घेतात

बसले होते एकांतात आठवल्या त्या आठवणी

बसले होते एकांतात आठवल्या त्या आठवणी
काही पुसटश्या तर काही दिसेनाश्या......

काहींना लागलेला गंज
तर काही अडगळीत पडलेल्या
वर्षानुवर्ष जपलेल्या
पण म्हाताऱ्या झालेल्या.....

काही अलीकडच्याच स्वप्नात झुलत होत्या
स्वताला न्याहाळत आकर्षित करत होत्या
त्यातही काही गोड तर काही कडू होत्या
काही सुखद तर काही दुखद......

जवळ कोणी नसताना
सोबत असल्याचा धीर देतात
फेकल्या कितीही दूर तरी
जीवनाचा आधार बनतात.....

किती विचित्र असतात या आठवणी
पण एकांतात साथ आपली देतात.....
मनात दुख असतानाही
चेहऱ्यावर हास्य आणतात
 
 
 
जीवनाच्या प्रवाहात
अनेक माणसं भेटतात,
काही आपल्याला साथ देतात
काही सांडून जातात........

काही दोन पावलेच चालतात,
आणि कायमची लक्षात राहतात,
काही साथ देण्याची हमी देऊन,
गर्दीत हरवून जातात........

नाती जपता जपता तुटणार
नवीन नाती जुळत राहणार,
आयुष्य म्हटले तर,
हा प्रवाह असाच चालत राहणार........

पण् कुणी दूर गेले तर
जगणेही थांबवता येत नाही,
कारण ह्या अथांग सागरात
एकटे पोहताही येत नाही....

येशील ?



अंधारात वाट शोधता येत नाही,
आणि कधीही परत येत नाही
त्याची कुणीच वाट बघत नाही....
तरीही मी अंधारात चाचपडायचं,
आणि वाट बघत रहायची..... तुझ्या येण्याची !

तू जाताना रणरणत्या उन्हाने
तुझे पाय भाजले असतील,
माळरानीचा उनाड वारा
तुझ्या केसांशी भांडला असेल....
आता मात्र तोच वारा
फुलांचा सुगंध गोळा करतोय,
आणि हिरव्यागार गवताचा स्पर्श
चुकलेल्या पावलालाही सुखावतोय... येशील ?

तेव्हा गावची नदी आटली होती,
आणि बहुतेक आपली मैत्री आणि गप्पाही...
आता काठांनाही पालवी फुटली आहे,
आणि शब्दांचा तर पूरच पूर....

बाकी काही नाही तरी
शब्दांना शब्दांची जोड द्यायला.... एकदा तरी येच !

दोन क्षण.....


मी पाहिले तुला
तु न् पाहिले मला,
चातकाने किती पाहिली वाट
ढ़ग मात्र न् बरसताच गेला!

कळया नुकत्याच उमललेल्या
पहाटेच्या दवाने न्हालेल्या,
तुज़्या ओन्जळित् हव्या होत्या खरया
पहिल्या मी सन्ध्याकाळि कोमेजलेल्या!

छोटासाच मी एक
खऴाऴता आहे झरा,
पारिजातक वाहण्याची होती आस
पाहिला मी रिक्त सडा!

सूर्यसुध्दा थाम्बलेला
चन्द्राच चान्दण प्यायला,
तुला खरच का वेळ नव्हता
मला दोन क्षण पहायला?

ह्याला जीवन ऐसे नाव...

 मृत्यू ज्ञात तरीही त्याची, बेगडी ती धाव.

वा‌र्‍यावरती फ़ुल आणि चंद्रावरती झूल
खिश्यांमधे कोंबलेला पोटासाठी पाव.
ह्याला जीवन ऐसे नाव...

भरभर वाटभर चांदण्यांचा थर
कुणी म्हणे धुळ त्याला घेई माथ्यावर
घामेजल्या अंगाचा हा कुणा पेहराव.
ह्याला जीवन ऐसे नाव...

चुल्ह्यावर भाकरीची थाप त्याला येई
नळावर पाण्यासाठी धाप त्याला येई
कमाई काय? दारावर तेव्हडच नाव.
ह्याला जीवन ऐसे नाव...

नव काय, जुन काय, वाहतं ते पाणी
साचलेल्या स्वप्नांमधे जाते जिंदगानी
सरड्याची ठरलेली कुंपणाची धाव.
ह्याला जीवन ऐसे नाव...

थकलेल्या देहाला ह्या फ़ुंकराची आस
बायको देते चहा बसं तेव्हडा वाटे खास
हातात घेतो रिमोट जरा M TV लाव.
ह्याला जीवन ऐसे नाव...