Monday, December 27, 2010

माफ कर मित्रा मला, मोठी चूक झाली यार

माफ कर मित्रा मला, मोठी चूक झाली यार,
त्या चुकीसाठी एवढी शिक्षा खूप झाली यार.
त्यादिवशी आपण एकमेकांशी विनाकारण भांडलो,
मग तू माझ्याशी कधीही न बोलण्याची शपथ घेतलीस,
तू माझ्याशी बोलणं सोडलस आणि मला एकट केलंस,
तोंड असून माझ्याकडे मला मुकं करून टाकलस,
खरंच सांगतो, मी आजकाल फारसं कुणाशी बोलत नाही रे,
बोलण्याकरता अनेक गोष्टी सुचतात आणि आतल्या आत विरतात...
तू जरी बोलणं सोडलस, तरी मी मात्र तुझ्याशी आजही पूर्वी इतकाच बोलतो,
पूर्वी फक्त मी तुझ्यातल्याच तुझ्याशी बोलायचो,
आज मी माझ्यातल्या तुझ्याशी बोलतो...
आजकाल तू मला नेहमीच टाळतोस,
मी असेन जिथे, तेथून तू पळ काढतोस,
थांबावं लागलंच तुला, तर माझ्या आरपार तू पाहतोस,
इतर मित्रांमध्ये तू खूष आहेस, आनंदात आहेस,
हे दाखवण्याचा अयशस्वी प्रयत्नही करतोस,
कधी एकदा माझ्याकडे, माझ्या डोळ्यांकडे बघ,
खात्रीनं सांगतो, मी त्याही वेळेस तुझ्याच कडे बघत असणार......




आठवतात का रे तुला क्रिकेटच्या मॅचेस पाहायचो आपण,
इंडियाची कुठलीही मॅच पाहताना सारं जग विसरायचो आपण.
आपल्या सचिनची मध्ये एकदा डबल century झाली होती,
यार, काय तुफान मजा आली होती.
त्यानं शेवटच्या over मध्ये २०० धावा पूर्ण केल्या,
आणि मी आनंदानं उडीच मारली,
टाळी देण्यासाठी हात वर केला, आणि.............
मग लक्षात आलं, घरात एकटाच होतो रे मी,
मगाच पासून एकटाच ओरडत बडबडत होतो मी,
तू जवळपास आहेस असं समजून आनंदात होतो मी......
त्यादिवशी तुझ्या जवळ असण्याची किंमत माझ्या टाळीसाठी आसुसलेल्या हातांनाही समजली.
तुझ्या असण्याची खूप सवय झाली आहे रे,
त्यामुळे तुझ्या नसण्याची सवय नाही करता येत मला.
तू जवळपासच आहेस, असा भास होतो मला, त्रास होतो मला.
खरंच एक सांगू , सचिनने त्या दिवशी उगाच एवढ्या धावा केल्या.......
उगाच एवढ्या धावा केल्या...............




लोकं विचारतात , तुमच्या भांडणाच कारण काय होतं?
कारण महत्त्वाचं नव्हतं रे, इतके दिवस ते टिकलंच कसं हाच प्रश्न पडलाय बघ मला,
खरं तर ती असते एक excitement , ओसरल्यावर राग जातो पण भांडण उरतं,
पूर्वी केलेल्या चुकांच्या पश्चातापामध्ये आपण रोज जळत राहतो,
झालेल्या जखमेवर खपली धरायच्या आधीच भळभळून रक्त वाहू लागतं.
पण मला ठावूक आहे, ही जखम फक्त मलाच झाली नाही,
त्या अग्नीमध्ये फक्त मीच जळतो असं नाही,
कारण मला माहीत आहे, माझं बोलणं ऐकणारे जर कोणी नसतील,
तर तुझ्याशी बोलणारेही खूप कमी असतील.
माझी टाळी घेणारे जर कोणी नसतील ,
तर तुला टाळी देणारेही कोणी नसेन.
आणि मला हेही ठावूक आहे , वर्गात बाकावर जशी माझ्या डावीकडील जागा नेहमीच रिकामी असते,
तशी तुझ्या उजवीकडील जागासुद्धा रिकामीच असते..............




आणि एक दिवस मी असाच तुझ्या विचारात खिडकी शेजारी बसून होतो,
तेवढ्यात मी तुला माझ्या घरी येताना बघितलं,
माझ्या डोळ्यांवर माझा विश्वास बसत नव्हता, पण ते घडत होतं.
तू घरात आलास, नकळत माझा हात हातात घेतलास.
खरं तर आता काहीच बोलण्याची गरज नव्हती, आणि शक्यही नव्हतं,
कारण शब्दांपेक्षा बाहेर पडायची घाई साल्या अश्रूंना झाली होती.........
मग तूच वाचा फोडलीस , आणि "Sorry" म्हणालास.
मीही तुला 'Sorry' म्हणणार इतक्यात.......गजराच घड्याळ वाजलं,
आणि नेहमीप्रमाणे त्या दिवशीही ते स्वप्न अर्धवट राहिलं,
पण खरंच एक सांगू, स्वप्नात का असेना,
तुला असं जवळून, हातात हात घालून पाहण्याचं सुख वाटत मला.
आजही मी असाच तुझ्या विचारात त्याच खिडकीशेजारी बसून राहतो,
कारण मला खात्री आहे, तू नक्की येशील ,
आणि नुसता हात हातात नाही तर घट्ट मिठीच मारशील.
अश्रूंना मी थांबवू शकणार नाही, पण मात्र माफी मीच आधी मागणार बरं का........
तेव्हा......करशील ना माफ मला?

नाही ती मला ,नाही सोडून गेली...

नाही ती मला ,नाही सोडून गेली...


नाही ती मला नाही सोडून गेली,
थोडस हसवून पार तोडून गेली..
स्वप्नांत छोटे घरटे बनवलेले,
स्वप्नातच ती ते मोडून गेली...

ती येण्या आधी,
मी माझा होतो...
ती आल्यावर तिचा...
मी ना आता माझा उरलो..
ना उरलो मी तिचा....

साला माझ्या डोळ्या देखात ती मला,
रक्ताळलेल्या शब्दांशी जोडुन गेली...
नाही ती मला नाही सोडून गेली....

रडायला येत ना,
पण मुलगा ना..
रडू शकत नाही..
मरावस ही वाटत ना..
पण जवाबदारी ना
मरु ही नाही शकत...

मरता येत नाही,
जगू शकत नाही..
मृत्यू ही माझ्या,
श्वासानशी भांडून गेली
नाही ती मला नाही सोडून गेली...

मला सोडून जाइलच कशी ती..
माझ्या डोळ्यात आहे ती...
माझ्या शब्दात आहे ती....
माज्या स्वप्नात आहे ती..
एवढाच काय..
तर माझ्या श्वासात आहे ती...

ती नाही..
तीच शरीर गेलय..
तीच मन तर माझ्याकडेच आहे...
स्वप्न घेऊन गेली तर गेली..
आठवणी तर माझ्याकडेच आहे....

कदाचित..
माझ्या पासून दूर जाताना..
ती तिलाच मारुन गेली
नाही ती मला नाही सोडून गेली...

आयुष्य खूप सुंदर आहे बघायला गेलं तर..................

आयुष्य खूप सुंदर आहे बघायला गेलं तर..................


आयुष्य खूप सुंदर आहे
बघायला गेलं तर

दु:खातही सुख आहे
जगायला गेलं तर

अश्रूंतही एक समाधान आहे
वाटायला गेलं तर

समाधानातही चिंता आहे
जपायला गेलं तर

काट्यांतही मखमल आहे
सोसायला गेलं तर

फुलां कडूनही जख्म आहे
कुस्करायला गेलं तर

अपयशातही नवी आशा आहे
पचवायला गेलं तर

यश खूपच क्षणिक आहे
उमजायला गेलं तर

मातीतच खरं सोनं आहे
शरीर श्रमाने माखल्यावर

रत्नांची शेवटी मातीच होते
फुलांनी शरीर झाकल्यावर

निखाऱ्यांवर चालावं लागतं
कापसावर उतानी पडल्यावर

वेदनांशी स्पर्धा करावी लागते
हास्य चेहऱ्या मागे दडल्यावर

कल्पना शक्तीचं प्रगती आहे
विज्ञानाचे धडे चाळायला गेलं तर

प्रगतीच विनाशाचं कारण आहे
इतिहासाचं चंदन उगाळायला गेलं तर

"त्यागा" पुढे सारचं शुल्लक आहे
विचारात गीतासार साठवला तर

उदार वृत्ती कधी कधी घातक ठरते
सुर्यपुत्र कर्ण आठवला तर....

खरचं आयुष्य ज्या थोड्यांना कळलं
त्या भाग्यवंतांचं ठीक आहे

उरलेल्यांसाठी एकचं प्रश्न.... पण
अगणित उत्तरांचं पीक आहे

आषाढातल्या मेघासम

आषाढातल्या मेघासम
भरुन आलो कितीदातरी
पण तू भिजशील म्हणून
बरसलोच नाही कधी

सप्तरंगी रंगात तुझ्या
रंगून गेलो कितीदातरी
पण तुझा रंग ओळखशील
म्हणून बोललोच नाही कधी

कितीदातरी बहरून आलो
प्रजाक्तासारखा .. तू भोवती असताना
पण कधी सांगितलं नाही तुला ..
सुगंधानं भोवळ येईल म्हणून

तुझ्याकडे येताना कितीदातरी
ओंजळ भरभरून फुलं आणली होती ..
पण ओंजळ लपवली मी ,
माझ्या फुलानीही तुझे हात पोळ्तील की काय म्हणून

कितीदातरी कविता माझी
शब्दांची शीडं भरुन हाकारली होती तुझ्याकडे
पण ओळींच्या मधलं
सांगितलं नाही तुला ..तू बावरशील म्हणून ..

कितीदातरी भेटलो आपण ,
बोलताना अडखळलो आपण
पण अडखळण्याचे अर्थ कधी
विचारले नाहीत तुला..कदाचित तुला ठेच लागेल म्हणून ..

सखे, तूच सांग आज मी
ओंजळ माझी कशी लपवू ?
ओंजळीतल्या फुलांचे
श्वास कसे मी रोखू ?

...निघालीसच सखे , तर
आज तशी तू जाऊ नको
माझी ओंजळ हाती घेतल्याशिवाय
निरोप माझा घेऊ नको

माझ्या ओंजळीतली चार फुलं
वेणीमध्ये खोचून जा
'तूझी होते रे ... काही क्षणतरी ..'
असं एकदाच लाजून सांगून

प्रेम नाही करता आलं परत....

प्रेम नाही करता आलं परत
लग्न मात्र करावंच लागल
भावनांना विरहाच्या शय्येवर झोपवून
पुन्हा एकदा जगावंच लागल

अलीकडे भावना बिलकुल गोंधळ घालत नाहीत
बहुतेक त्या शिकल्यात आता मुक्यानेच रडण.....
माझ्याप्रमाणे त्यानाही वाटल होत
सहन करू शकतील त्या हे विरहाच वावटळ
पण अस काही जगण वाहून गेलंय की
आभाळ राहिलंय ना मनाचा तळ....


आता नाही कुठेच ठिकाणा
फिरता आहेत भावना पोरक्या होऊन......
रखरखत्या उन्हात......
ओसाड वाळवंटात.....


तू पडशील नजरेस एकदा या आशेवर......
अगणित विरहाच्या सुया टोचून घेतल्या आहेत
नेहमीच......
नेहमीच वेदनेशिवाय तुझ्या प्रेमाने काहीच दिल नाही
पण दोष त्यांचाही नाही,
निस्वार्थी प्रेमाशिवाय त्यांनीही दुसरं काहीच केलं नाही

ते दोघही एकमेकांवर

ते दोघही एकमेकांवर

जीव ओवालुन टाकत होते

ते फ़क्त एकमेकांसाठीच बनले आहेत

असे प्रत्येक जन म्हणत होते

एक क्षणही ते एकमेकांना सोडून राहु शकत नव्हते

त्या दिवशी त्याला गावाकडून बोलावणे आले

तो तिला काही दिवसात येतो म्हणून निघाला

आज खुप दिवस झाले पण तो आणखी आला नाही

ती सतत त्या वाटेला बघत रहायची

भकास डोळ्यात त्याचेच स्वप्न पहायची

पण तो काही आलाच नाही

मग काही दिवसाने तो आला

परन्तु तोवर खुप वेळ झाली होती

तिचा हाथ आज कुमाच्या तरी हातात होता

त्याला पाहताच तिची नजर बोलून गेली

ती म्हणाली=

वाट पहिली तू येशील म्हणून

पंती लावून ठेवली होती

अंधार पडेल म्हणून

तू तेव्हा आलास जेव्हा पंती गेली होती विझून

माझे दुर्भाग्य बघ तू मला शोधत आहेस

माझ्याच समाधीवर बसून

तो म्हणाला=

आता मी तुला काय शोधणार

तुझ्याच समाधीवर बसून

आग ! मी आज स्वताच समाधिस्त झालो आहे

तुझी ती समाधी बघून

कसलं रे हे तुझं logic.......?

कसलं रे हे तुझं logic.......?


म्हणे दूर राहिलो की समोरच्याला आपली किंमत कळते
कसलं रे हे तुझं logic.......?
मला मुळीच कळत नाही
तू बोलेनासा झालास ना मग
हे तुझ प्रेम आहे की राग.......
याचंही उत्तर मिळत नाही
मनाची गुंतागुंत होते sms करावा,
phone करावा की गप्पं रहावं?
खुपदा sms type करून delete होतो,
सारखं number dial करून cut केला जातो...
माहितेय मला दुरावा तुला असाह्य होतो
पण नाही बोलता आलं कधी म्हणून प्रेम का कुठे आटत?
बघ ना आभाळही कधी-कधीच काळभोर होऊन दाटत
आणि क्वचितच क्षितीजापलीकडे जमिनीला भेटत
कस पटवून देऊ तुला मलाही तुझ्याइतकाच
दुरावा असाह्य होतो.
फरक इतकाच आहे.....
मी लिहून सांगते आणि तू
न बोलता खूप काही बोलून जातो.....!

आठवण म्हणजे...

आठवण म्हणजे...


आठवण म्हणजे नक्की
काय भानगड असते?
प्रत्येकाच्या मानामध्ये
का घर करुन बसते?

आठवण असते...
कधी तिखट कधी गोड
कधी लहान कधी थोर,
कधी व्यक्त कधी अव्यक्त
कधी दु:खी कधी आनंदी.

आठवण असते...
आईचा हात धरुन
दुडू दुडू पळणारी,
बाबांच्या खांद्यावरुन
सारं गावं फ़िरणारी.

आठवण असते...
वर्गामधल्या मित्राची
हळूच खोडी काढणारी,
शाळेला दांडी मारुन
चिंचा बोर खाणारी.

आठवण असते...
बावरलेल्या नजरेनं
कॉलेजकडे पाहणारी,
कट्य़ावरच्या गप्पांमधे
तासनतास रमणारी.

आठवण असते...
तिच्या लाज-या स्मीतासाठी
दिवस रात्र झुरणारी,
मनातल्या भावना तिला
सांगायला घाबरणारी...

आठवण म्हणजे...
गतकाळाच्या क्षणांची ती
गोड साठवण असते,
प्रत्येकाच्या आयुष्याला
सुवर्ण कोंदण असते.

Tuesday, December 14, 2010

काय सांगु माझ्या बद्द

काय सांगु माझ्या बद्दल
मलाच काही कळत नाही
बोलायच खुप असत मला
पण बोलणं मात्र जमत नाही.

काय सांगु माझ्या बद्दल
मलाच काही कळत नाही
दुखवल जात आम्हाला
दुखवता आम्हाला येत नाही.

काय सांगु माझ्या बद्दल
मलाच काही कळत नाही
खोट खोट हसता हसता
रडता मात्र येत नाही.

काय सांगु माझ्या बद्दल
मलाच काही कळत नाही
दुःखात सुख अस समजता
दुःख ही फिरकत नाही.

काय सांगु माझ्या बद्दल
मलाच काही कळत नाही
बरोबर बरेच असतात
पण एकटेपणा काही सोडत नाही.

काय सांगु माझ्या बद्दल
मलाच काही कळत नाही
चार शब्द सांगतो
पण कोणी ऐकतच नाही.

काय सांगु माझ्या बद्दल
मलाच काही कळत नाही
ज्यांना आम्ही मित्र मानतो
मित्र ते आम्हाला समजतच नाहीत.

काय सांगु माझ्या बद्दल
मलाच काही कळत नाही
मांडायचा प्रयत्न करतोय
पण शब्द ही आम्हाला पुरत नाहीत. ......

Chetan Bhagat Message

स्पर्शं ..........!

स्पर्शं ..........!
केसांचा गुंता सोडतांना
एकदा तरी विचार कर,
बघ डोळे भरून येतील....
अश्रू भरभरून वहुत दे;
हृदयाला समजवण्यासाठी......!
पण............
पण तेव्हाच;
माझ्या हातांच्या स्पर्शाला
तुझे आसवे आसुसलेली असतील.
कदाचित......
कदाचित त्यामुळे तरी
ती डोळ्यांतून येणार नाहीत ...!
कारण...
तुला माहीतच आहे;
त्यांनाही माझ्या स्पर्शाची थोडी फार सवय झालेली असेल......!

केसात गजरा लावतांना
माझे एखादे वाक्य आठव;
हात हळूच मागे येतील....
पण..........
पण तेव्हाच,
नेहमी सारखा हट्ट पणा तुझा
तो तू घालाशिलच ....!
पण तो गजरा सुद्धा क्षणार्धात शोशीला जाईल.
कारण...........
तुला माहीतच आहे;
त्या गजऱ्यालाही माझ्या स्पर्शाची थोडीफार सवय झालेली असेल....!

जरा कधी चालतांना,
ठेच लागून खाली पडशील;
स्वताला सांभाळ.....
पडतांना हात तुझा हळूच वर उंचावलेला असेल,
आधार शोधायला त्यालाही वरती यावं लागेल....
कारण....
तुला माहीतच आहे;
तुझ्या हातांनाही माझ्या स्पर्शाची थोडीफार सवय झालेली असेल.

"प्रेम कथा "

"प्रेम कथा "
अंजली:- "हो विशाल, तू चांगला मुलगा आहेस, ........... पण मी राहुल ला सोडू नाही शकत....... कारण राहुलच्या हृदयाला
होल आहे आणि आता त्याच्याकडे कमी दिवस राहीले आहेत, त्याचे राहिलेले आयुष्य मी त्याच्या बरोबर राहावे अशी आमची दोघांची इच्छा आहे........... कारण आमचे प्रेम खरे आहे "

विशाल:- "माझे पण तुझ्यावर खरे प्रेम आहे त्यामुळे तुला आमच्या दोघांपैकी एकाची निवड करावि लागेल"

अंजली :- "राहुल कडे कमी आयुष्य आहे म्हणून मी त्याला सोडून तुझ्याबरोबर येऊन खर्या प्रेमाचे नाव बदनाम नाही करू शकत" So I am sorry Vishal ........!!

(10 दिवसांनतर)

राहुल :- "अंजली एक आनंदाची बातमी,....... मी heart transplant करून घेतले,......... दोघेही खूप खुश झाले.......

तितक्यात डॉक्टरांनी त्यांना एक पत्र दिले,

त्या पत्रात लिहिले होते की, "अंजली मी तुमच्या प्रेमामधे येऊ शकत नाही...... पण तुझ्यावर प्रेम करणेही थांबवु शकत नाही आणि तुझ्या शिवाय जगू सुधा शकत नाही, म्हणून मी माझे हृदय राहुलला दिले आहे फक्त एका छोट्या अपेक्षेने की मलाही तुझे प्रेम मिळत राहील"

I love you and now have a long love life ahead. फक्त तुझाच, स्वर्गवासी (हृदयवासी) विशाल

म्हणूनच मला ईच्छा असून, मोकळं रडता येत नाही

कपडे स्वच्छ ठेवून कधी, चिखलात पडता येत नाही
आरसा पुढे ठेवून स्वतः पासून दडता येत नाही

प्रेम आणि स्वात्यंत्र हे विरूध्दार्थी शब्द आहेत
पंखात पंख घालून कधी, गगनात उडता येत नाही

मनात जिद्द असेल तर "एव्हरेस्ट" सुद्धा पार होतो
मेलेल्या मनाला साधा, जिना चढता येत नाही

आयुष्य धरायला गेलात तर, चावतं एखाद्या कुत्र्यासारखं
पण पळून जाईल ह्या भितीने, त्याला सोडता येत नाही

पूल बांधा, धरण बांधा, कालवे काढा उपयोग नाही
जेव्हा तुम्हाला माणसाला, माणूस जोडता येत नाही

आले जर माझ्या डोळ्यात पाणी तर हारलो मी म्हणून दैव सुखावेल
म्हणूनच मला ईच्छा असून, मोकळं रडता येत नाही

असाच कधीतरी येउन जा,

असाच कधीतरी येउन जा, फुल तुझ्या आठवणीची घेउन जा.

खुप सुगंधित करून ठेवलय त्याना, हृदयाच्या कप्प्यात भरून ठेवलय त्याना,

असाच कधीतरी स्वारी करून जा, माझ्या प्रेमाची किमत घेउन जा,

त्या आठवणीना असच उजलू दे, सघर्षमय या जीवनात सोन त्याच होऊ दे,

हतबल असा होऊ नको रे ते क्षण त्या आठवणी तुझ्याच होत्या, हे जगाला दाखउन दे......,

तुझ्या भावनांचा स्पर्श माझ्या भावनाना होताच, अगदी पाण्याहुन वीरघलुन गेला रे.....,

तू दिलेल्या जखामाना ताज करून गेल्या रे.....,

किती लिहू रे तुला, जगाइतका कागद केला, पाण्याइतकी शाई केली,

तरी त्या प्रेमाची महती संपणार नाही, आणि कुणाला त्याची किमत कळणार नाही,

अगदी तुलाही................!!!

" बाई ओळखलत मला ?

" बाई ओळखलत मला ?" ...
... " कोण रे बाबा तू ?"
" मी तुमचा विद्यार्थी शाळेतला "...
... " अरे कसा आहेस बाळा तू ?"

किती तरी वेळ मग बाई
चष्मा वर खाली करत राहिल्या
कपाळाची ताणून शीर
ओळखीन थोड पाहू लागल्या

" नजर कमजोर झाली रे आता "
" विसरायला होत खूप काही "
" तुम्ही असे अचानक उभे ठाकता "
" शरीर आता तशी साथ देत नाही "

कौतुकाने मग बाई बोलत होत्या
माझ्या यशाने खूप भारावत होत्या
सारे सारे कसे तृप्त भाव
मनगटी एक बळ देत होत्या

मी मात्र तेव्हा त्या दिवसांत रमलेला
आठवीत त्यांच्या त्या शिकवणीला
वाटे अजूनही पुन्हा लहान व्हावे
काळही कसा तो मंतरलेला

कापऱ्या हातांनी मग गोंजारत मला
डोळाभर प्रेमाने पाहिलं त्यांनी
सुखात रहा म्हणत शेवटी
रोजचा रस्ता धरला त्यांनी

पाठमोऱ्या जाताना त्यांचा
पदर डोळ्याकडे सहज गेला
दाटल्या अश्रूंना तेव्हा
आठवांसवे टिपत गेला

त्या नजरेआड होईस्तोवर
मी तिथे तसाच थांबलेला
हरवले कसे अन सुटले किती
क्षण हाही तसाच निसटलेला

पापण्यांना आसवांचा भार झाला

पापण्यांना आसवांचा भार झाला
काळजा च्या भावनाना आसवांचा पूर आला
पाणावल्या पापण्यांना आसवांचा भार झाला

पांघरले वेड तू विसरून सर्व काही
प्रेमाचा या आपल्या गलबलाच फार झाला

वाहणाऱ्या आसवांना थोपवू तरी कसा
कोंडलेले श्वास तुझे भरुनिया उर आला

जा आता तू सुखाने ,मी ही आहे निवांत
पाहिलेल्या स्वप्नांचा असा चकनाचूर झाला

ही कथा आहे , एका 'त्या'ची , एका 'ति'ची

ही कथा आहे , एका 'त्या'ची , एका 'ति'ची,
आणि , हसरया , खेळत्या , ताज्या , टवटवीत गुलाबाची.

तो तिला पहायचा , आणि सारं जग विसरायचा,
ती सुद्धा त्याला पहायची , पण न पाहिल्यासारखं करायची.

बसमधल्या गर्दीत सुद्धा ती त्याला सहजपणे दिसायची,
बसमधल्या गर्दीत सुद्धा , ती , त्याला दिसेल , असंच बसायची.

कॉलेजमधल्या गलक्यामध्ये त्याला फक्त तिचाच आवाज ऐकू यायचा,
चोरट्या नजरेतून तिनं टिपलेल्या त्याच्या नजरेतल्या भावना तिला समजायच्या.

गर्दीतल्या प्रत्येकीच्या चेहऱ्याची जागा तिच्या चेहऱ्यानं घेतली,
ती नसतानाही तिथं , हळूच त्याच्याकडं बघून हसू लागली.

पुरे झालं मौनव्रत , बस्स झालं आता,
तिचाच विचार करून करून भणभणउ लागला माथा.

आणि एक दिवस त्यांना मनाशी पक्का निश्चय केला,
बागेतल्या गुलाबंपैकी एक गुलाब कमी झाला.

हातात गुलाब , मनात निश्चय , आणि छातीत ढोल बडवत तो निघाला,
पण , बंद पडली शब्दांची factory पाहताच समोर तिला.

' माझ्या हातातल्या गुलाबाचा अर्थ तिला उमजेल काय ?
शब्दांविना डोळेच तिला ह्याचा अर्थ समजावतील काय ? '

तिच्या डोळ्यांनी हेरला अर्थ त्याच्या डोळ्यांचा,
पण , शब्द बाहेर पडले , " गुलकंद छान होतो ह्याचा ! "

त्याचा अर्थ त्याला समजल्यावर शब्दही दचकले,
आजूबाजूचे सारे जग पोट धरून हसू लागले.

त्याच्याच शब्दांनी दगा दिला त्याला ,
हातातला गुलाब नाहीसा कधी झाला , समजलंच नाही त्याला.

तो आजही तिला गर्दीत शोधात राहतो,
असली तर दिसते , नसली तर पूर्वीप्रमाणे हळूच हसते

तो मान खाली घालून जातो , समोरून जाताना बागेच्या,
तो दिसताच गुलाब ओरडतात , " गुलकंद छान होतो आमचा ! "

हि कथा होती त्याची , तिची आणि ........
आणि एका हसऱ्या , खेळत्या , पण आता सुकलेल्या , तिच्या पुस्तकात जपून ठेवलेल्या , गुलाबाची .......

ओल्या जखमा ....

ओल्या जखमा ......
कसा होऊन राहिलो आहे मी
एकदम विरक्त
जगायचे म्हणून जगतोय
दिवस काढायचे म्हणून काढतोय

एक एक करून जमा केलेल्या तुझ्या आठवणी
कुठे गेल्या कळत नाही
शोधल्या मनात किती
तरी त्या मिळत नाही

कसले धुके जमले आहे डोळ्यासमोर
की आता तू ही दिसत नाहीस
काल मित्र ही म्हणत होता की
का रे तू आता पहिल्यासारखा एकट्यात जाऊन बसत नाहीस

लगेच उठलो
काढले ते जुने सन्दुक
सापडले ते अडीच फोटो
२ पूर्ण १ आपल्या भांडणात अर्धा फाटलेला
आणि ते गुलाबी एकुलते एक पत्र
डोळ्यासमोर धरून डोळे मिटले
एक एक अक्षर झरझर डोळ्यासमोरून गेली
आणि तुझ्यासोबत जगलेला तो प्रत्येक क्षण पण ..
परत भरत आलेल्या जखमाच्या खपल्या निघाल्या
परत त्या ओल्या जखमा भळभळ वाहू लागल्या
परत तोच तुझा भास, तोच दरवळ
आता कसे बरे वाटत आहे ....

ती मला तिचा " best friend " मानायची..

मला वाटायच तीच माझ्यावर जीवापाड प्रेम आहे .
फ़क्त मी विचारायची देरी आहे ..

मलाही ती प्रचंड आवडायची

जेव्हा ती मला आपला " best friend " म्हणायची ,
मनातल गुपित फोडायची ,
लाडत येऊन बोलायची ,
लटक रागवायाची ,
माझ्याशी भांडायची ,

गप्पा मारायची ..
माझ्या कविता ऐकायाची,

त्याना उत्सुर्फ़ दाद द्यायची ..
माझ्यावर प्रेम करायची ..

पण मला माहित नव्हत ती मला
फ़क्त आपला " best friend " मानायची ..


मला खुप यातना झाल्या, जेव्हा ती म्हणाली .
"मी प्रेमात पडले रे त्याच्या...."
पण तिच्या अपेक्षेप्रमाणेच मी तेव्हा तिची थट्टा केली .
अन तिची कळी लगेचच खुलवली,
तिला काय सांगू काय नको चालेल.
असे तिला मी कितीदा तरी पहिलेल .
मी म्हणालो, "मज़ा आहे बुवा एका मुलीची.!"
ती म्हणाली," तुला पण मिळेल रे साथ कोणा सुंदरीच .!"

मन रडत असतानाही रडत होतो.
तिला कलू न देण्याची सगळी काळजी घेत होतो .
तिला पण काहीच कळल नाही .
प्रेमात पडलेल्या तिला वेगळ काहीच दिसत नाही .


मी पण तसदी घेतली नाही मनातल काही बोलायची..
कारण ती मला आपला " best friend " मानायची ..


ती गेल्यावर मी सुन्न जालो ,
आतल्या आत मी मग्न झालो ,
तिच्या आठवणी मी आठवू लागलो .
त्या पुसून टाकायचा निष्फ़ळ प्रयत्न करू लागलो ,
तिच्याशी बोलताना मी तिची खुप थट्टा करायचो .
'त्याच्या' नावाने तिला भरपूर चिडवायचो .
कोणाशी भांडल्यावर मात्र तिला माजी आठवण यायची .
आजही माज्या मध्यस्थीची तिला गरज वाटायची ,
ती अजुन ही माज्याशी खुप बोलायची ,
खुप काही सांगायच म्हणायची ,
पण कधी ते सांगायला विसरायाची..
 मनातले अश्रु मी तिला कधीच दिसू दिले नाहीत ,
कारण ती मला तिचा " best friend " मानायची .

मी मात्र आतल्या आत कुढत बसायचो,

माज्याच एकटेपणात हरवलेला असायचो.
तिचे बोलणे ऐकत असताना ,
मुकपणे आपले अश्रु गिळत असायचो
तिच्यासमोर नाटक करणे फारच कठीण होते .
त्याच तीच भांडण ती मला येऊन सांगायची .
माज्याशी बोलून मोकळ वाटल अस म्हणायची.
स्वत:च्या वेदना लपवून तिचे बोलणे..
शांतपणे ऐकून घ्यायचो .
एक दोन गोष्टी सांगून..
तिला बरे वाटावे असे काहीतरी करायचो ..

माझ्या बोलन्यापेक्षा माझ्या हसन्यावरच ती समाधानी असायची ..
कारण ती मला तिचा" best friend " मानायची ..

आधेमधे तिलापण काही तरी हुक्की यायची ,

कोणाच्याही नावावरून मला चिडवून पहायची .
मीही हसून खोटा राग दाखवायचो ,
तिच्या चीडवन्यावर खोटे चिडून तिला खुष करायचो .
माझ्या वेदना आणि दुःख कधीच दाखविले नाही ,
एका शब्दाने ही तिला कळू दिले नाही .

त्या दिवशी त्याची आणि माजी भेट जाली..,
माजी ठसठसणारी जखम पुन्हा उघडी पडली ..
तिने माजी ओळख चांगला मित्र म्हणुन करून दिली .
मी भेट दिलेल्या "माझ्या कविताची वही" त्याला दाखविली.
दुसरयाच दिवशी त्याने तिला आपली कविता भेट दिली..
कारण त्याला कदाचित तिच्या बद्दल असुरक्षितता भासली .


तिला मात्र कधीच याची भिती नाही वाटायची..
कारण ती मला तिचा" best friend " मानायची .


तिच्या लग्नामधे तिने मला आवर्जुन बोलावले..
"लग्नाला नक्की यायचे " असे पत्रिकेत लिहून पाठविले .
माझ्या ह्रुदयाची शकले मीच गोला केली ,
एक तिच्या आवडीचे गिफ्ट घेवून तिची भेट घेतली ..
चेहरा हसरा ठेवून मी काळजी घेतली तिला खूष ठेवायची .
कारण ती मला तिचा " best friend " मानायची..


तिच्या लग्नानंतर मात्र मी एक गोष्ट केली
कटाक्षाने तिची भेट टाळली .
माझ्या वागन्यातला फरक .
तिला कलू द्यायची माजी तयारी नव्हती ..
कारण त्याच्या प्रेमात बुडालेल्या तिला..
माझ्या अश्रुंची मुळीच कदर नव्हती .
मी इतके दिवस असे काही दाखवले नाही
कारण ती मला फक्त तिचा" best friend " मानायची ..


आयुष्यभर एकट राहून जगत आलो,

तिच्या पत्राना जानून बुजुन एक दोन ओळीत उत्तर लिहू लागलो
माझ्या बिजी लाइफचा चांगला बहाना माझ्या कड़े होता..

तिच्याही व्यापनमुले तिला आजिबत वेळ नव्हता ..
तरी पण माझ्या एक दोन ओळीना ती उत्तर पाठवायची ..
कारण ती मला तिचा " best friend" मानायची..


तिच्या अखेरच्या क्षणी मी तिला भेटलो ,
इतके दिवस थाम्बलेल्या अश्रु संकट बोललो ..
शेवटच्या घटका मोजताना तिला फार बोलावले नाही ..
मलाही जास्त वेळ थाम्बवले नाही .
तरीही एका वाक्यात तिने सांगितले ..
"तू आता पर्यंत खरे मित्रत्व दाखवले "
डोळ्यानीच ती म्हणायचे ते म्हणाली ,
ती मला तिचा " best friend " मानायची..

आता माझा ही प्रवास संपत आला आहे ,

मागे बघताना त्या हीरवळीचा हेवा वाटत आहे ,
आताच पोस्टमन येवुन हे पारसल देवून गेला ..
माझ्या मनात प्रश्नांचे काहुर माजवुन गेला .
काय गरज होती का तिला तिच्या मृत्युपत्रात
आवर्जुन माझ्या साठी काही ठेवायची ...!
पण नाही , कारण ...
ती मला तिचा " best friend " मानायची..


तिच्या डायर्यांमधे सापडले ,

माजे हरवलेले क्षण, आठवणी ,
खोडया, थट्टा, हसने, बोलणे, रडणे..,
गुपित, गोष्टी, गाठी, भेटी ...
मैत्री आणि बरच काही ..
आणि पटत गेले की ..,
खरच ती मला तिचा " best friend " मानायची..


जेव्हा शेवटच्या पानावर तिच्या ओळी वाचल्या ..

ह्रुदयातिल अश्रूना जणू वाटा मोकाळ्या जाल्या..


"मला वाटायच त्याच माझ्यावर जीवापाड प्रेम आहे ..
फक्त त्यांन मला विचारायची देरी आहे ...
मला तर तो प्रचंड आवडतो ..
मी त्याला " best friend " म्हटल्यावर ..
गालातल्या गालात हसतो ....
मनातल गुपीत सांगतो . माजे ऐकतो ...
माझ्याशी भांडतो ....
त्याच्या कविता ऐकवून ,
माझ्या कड़े अर्थपूर्ण कटाक्ष टाकातो ..

माझ्या वर प्रेम करतो ....
खरच का तो माझ्या
वर खर प्रेम करतो ...?


जणू माझ्या
ओळी मी तिच्या डायरीत वाचत होतो ..
मरन्यापूर्वी सरणावर जळत होतो..
काय गरज होती मरण शय्येवर नियतीनेही
माझी अशी क्रूर थट्टा करायची ...

त्या शेवटच्या क्षणी मला जाणवून दयायची की ...
वेड्या ती तुला तीच " true love " मानायची..