तुझ्याशिवाय माझ्या आयुष्यात,
काहीसुध्दा उरलं नाही.
हे असं का झालं,
ते मलासुध्दा कळलं नाही.
रोज समोर येउनसुध्दा,
कधीतरी पाहतेस.
तुझ्या “त्या” नजरेने,
मन माझं जिंकून जातेस.
मी काय करतो, कसा वागतो,
ते मलासुध्दा कळत नाही.
असं वाटतं तुझ्याशिवाय
मला काहीच अर्थ उरत नाही.
कितीही झालं, काहीही झालं,
तरी मलासुध्दा मनं आहे.
फ़ार मोठं नसलं तरी,
त्यातसुध्दा “प्रेम” आहे.
तू “हो” म्हण किंवा “नाही”,
शेवटपर्यंत तुझीच प्रतीक्षा आहे.
या नाहीतर पुढच्या जन्मी,
तुझ्या प्रेमाची अपेक्षा आहे.
जे घडेल ते सहन करायचे असतं..
14 years ago

No comments:
Post a Comment